‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यासारख्या असंख्य चित्रपटांचे दिग्दर्शक विजू माने यांचा आज वाढदिवस आहे. चित्रपट आणि वेबसीरिजच्या माध्यमातून ते कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. वाढदिवसानिमित्त मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अभिनेता कुशल बद्रिकेनेही विजू मानेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : ‘तारक मेहता…’ मालिकेतून रिटा रिपोर्टरने घेतली एक्झिट; म्हणाली, “निर्मात्यांनी गेल्या ८ महिन्यांपासून…”
अभिनेता कुशल बद्रिकेने लाडक्या मित्राला जुन्या आठवणींचा उलगडा करत शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये कुशलने विजू यांनी अडचणीच्या काळात मित्रांना कशी मदत केली होती याबद्दल खुलासा केला आहे. तसेच विजू मानेंचे त्यांच्या कुटुंबीयांवर किती प्रेम आहे याची प्रचितीही कुशल बद्रिकेने शेअर केलेली पोस्ट वाचून येते.
हेही वाचा : Video : ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला रामराम केल्यानंतर शरद पोंक्षे दिसणार नव्या भूमिकेत, पहिली झलक समोर
कुशल बद्रिकेची पोस्ट
रम्मीच्या डावात १३ पानातली ३ पानं jockers आणि 6 इतर असा विश्वविक्रम करुन स्वतःलाच आश्चर्यात पडणारे, मित्रांनी अडचणीच्या वेळी घेतलेले हजारो रुपये बुडवले तरीही मैत्रीत काही न बोलणारे पण कधीतरी गम्मत म्हणून पत्ते खेळताना चुकून 150/200 रुपये जिंकलेच तर ते मात्र बुडता कामा नये असे तत्वनिष्ठ, Struggler sala ह्या आमच्या webseries साठी आमच्या dates एकत्र मिळाव्या ह्या साठी गेली अनेक वर्ष struggle करणारे. लेखक, दिग्दर्शक , निर्माता या पलीकडे जाऊन “जेवणात ताक आणि मनात कायम बायकोचा धाक” अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे. आणि sunday family साठी राखून ठेवणारे. विजू दादा तुम्हाला happy birthday
हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’चे चाहतीने केलेले कौतुक पाहून केदार शिंदे भारावले; कमेंट करत म्हणाले, “स्वामी कृप्रेने…”
दरम्यान, कुशल बद्रिकेच्या पोस्टवर अभिनेता संतोष जुवेकरने खास कमेंट करून लक्ष वेधले आहे. संतोष लिहितो, “तुझी post वाचून आठवलं मी मानेचे ७० रुपये द्यायचे बाकी आहे. तरीच तो सतत call करतोय मला” तर, इतर काही युजर्सनी विजू मानेंना कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.