झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. याच कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेला कलाकार म्हणजे कुशल बद्रिके. कुशल सध्या लंडन दौऱ्यावर आहे. संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटात तो महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सध्या तो लंडनला या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

संजय जाधव त्यांच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी तू ही रे, दुनियादारी, खारी बिस्किट यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तर सध्या टे त्यांच्या आगामी चित्रपटाचं लंडनमध्ये शूटिंग करत आहेत. या त्यांच्या चित्रपटात प्रार्थना बेहरे, कुशल बद्रिके, अभिनय बेर्डे हे कलाकार महत्वपूर्ण भूमिका सकरताना दिसणार आहेत. आता या शूटिंगदरम्यानचा एक बिहाईंड द सीन व्हिडीओ प्रार्थनाने पोस्ट केला आहे.

Supriya Sule and Pankaja Munde (1)
VIDEO : अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट, सुनेत्रा पवार येताच…; व्यासपीठावर नेमकं काय घडलं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
bhaskar jadhav and uday samant
Uday Samant : “शिवसेनेची काँग्रेस झालीय”, भास्कर जाधवांच्या विधानावर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मोठ्या नेतृत्त्वाचं…”
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis in buldhana
प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्र्याना दिला हा प्रस्ताव, फडणवीस म्हणाले नक्कीच विचार करू

हेही वाचा : Video: नाचता नाचता स्टेजवरून खाली पडला कुशल बद्रिके, ‘चला हवा येऊ द्या’मधील व्हिडीओ व्हायरल

कुशल बद्रिके अत्यंत दिलखुलास आहे. तो जिथे जाईल तिथलं वातावरण आनंदी आणि हसतं खेळतं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर चित्रीकरणादरम्यानही तो खूप मजा मस्ती करत असतो. आता लंडनला जाऊन तो प्रार्थना आणि अभिनयशी गप्पा मारताना संजय जाधव यांची नक्कल करताना दिसला. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की ती आणि अभिनय गप्पा मारताना “संजय सर आले” असं म्हणतात आणि कुशल तिथे येतो. तर त्यानंतर तो संजय जाधव यांच्या स्टाईलमध्ये तो प्रार्थना आणि अभिनयशी गप्पा मारताना दिसतोय. “लंडनच्या थंडीत शूटिंग करायला खूप मजा येते असं तो म्हणताना दिसला.” तर इतक्यात संजय जाधव येतात आणि कुशल एकदम नक्कल करायचा थांबतो. “लंडनच्या थंडीत शूटिंग करायला खूप मजा येते का?” असं म्हणत तेही त्यांच्यासोबत हसू लागतात.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

आता त्यांचा हा व्हिडीओ आता खूप व्हायरल आहे. तर त्यांच्यातली ही मजा मस्ती आवडली असल्याचं सांगत आहेत. तर याचबरोबर त्यांच्या या आगामी चित्रपटासाठी त्यांचे चाहते उत्सुक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा त्यांचा चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे काही दिवसांतच कळेल.

Story img Loader