छोट्या पडद्यावरील ‘लागिर झालं जी’ मालिकेतून अभिनेता नितीश चव्हाण घराघरात पोहोचला. या मालिकेतील त्याने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. या मालिकेमुळेच नितीशला लोकप्रियता मिळाली. आता तो मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठातील ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटाची बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटातील कलाकरांचे लूकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. तर शरद केळकर शूरवीर बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेत आहे. आता या चित्रपटात नितीश चव्हाणचीदेखील वर्णी लागली आहे.

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ चिन्ह मिळाल्यानंतर आदेश बांदेकरांनी शेअर केला जुना व्हिडीओ

‘हर हर महादेव’ चित्रपटातील नितीशच्या लूकचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात तो ‘धनाजी म्हसकर’ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानणाऱ्या, त्यांच्या अनेक निष्ठावान, धाडसी आणि विश्वासू मावळ्यांपैकी एक म्हणजे धनाजी म्हसकर. भूमिका साकारत आहेत अभिनेते नितीश चव्हाण”, असं कॅप्शन देत त्याने पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा >> बोल्डनेसचा तडका, अतरंगी स्टाइल अन् उर्फी जावेदच्या नव्या गाण्याने प्रेक्षकांना पाडली भूरळ, कमेंट करत म्हणाले “स्टारकिड्सपेक्षा…”

हेही पाहा >> Photos : भाग्यश्री मोटेच्या साखरपुडा सोहळ्यात हृतिक रोशनला पाहून चाहत्यांना पडला प्रश्न, जाणून घ्या कारण

‘हर हर महादेव’ चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकर, हार्दिक जोशी, सायली संजीव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagir zal ji fame actor nitishi chavhan to play historical role in har har mahadev movie kak
Show comments