दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. आपल्या अभिनयाने त्यांनी मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठीबरोबरच बॉलीवूड चित्रपटातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांची पत्नी प्रिया बेर्डे यासुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहेत. लक्ष्मीकांत व प्रिया यांना दोन मुलं आहेत. मुलगा अभिनय मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आता त्यांची धाकटी मुलगी स्वानंदीही लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- अथांग समुद्र, रोमँटिक पोझ अन्…, प्रथमेश परबचं क्षितीजाबरोबरचे प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलंत का?

या अगोदर स्वानंदीने नाटक व एकांकिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आता लवकरच तिचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मन येड्यागत झालं’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात स्वानंदीबरोबर अभिनेता सुमेद मुगदलकरची प्रमुख भूमिका आहे, तर अभिनेत्री श्वेता परदेशी सहकलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

योगेश जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, संदीप पांडुरंग जोशी, कुणाल दिलीप कंदकुर्ते व ‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. निलेश पतंगे यांनी या गाण्यांना संगीत दिले असून या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांचा आवाज लाभला आहे. येत्या १ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Late actor laxmikant berde daughter swanandi berde debut by man yedyagat zala movie dpj