दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा, अभिनेता शुभंकर एकबोटे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेत्री अमृता बने हिच्याशी शुभंकर लग्न करणार आहे. नुकतंच शुभंकरच्या घरी मेहंदी समारंभ झाला. अगदी साध्या पद्धतीत, कुठलाही गाजावाजा न करताना जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत छोटेखानी मेहंदीचा समारंभ पार पडला. याचा व्हिडीओ शुभंकरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर व अमृताचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. सारखपुड्यात दोघांबरोबर काही छान खेळ देखील खेळण्यात आले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. साखरपुड्याच्या चार महिन्यानंतर ६ एप्रिलला व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला. दोघांच्या कुटुंब व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शुभंकरची होणारी बायको अमृता निळ्या रंगाच्या साडीत खूप छान दिसत होती. तसेच डोक्यावर टोपी व कुर्ता या लूकमध्ये शुभंकर देखील छान दिसत होता.

हेही वाचा – Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी

काल, १८ एप्रिलला शुभंकरच्या घरी मेहंदी समारंभ झाला. यावेळी अभिनेत्याने दोन्ही हातावर मेहंदी काढली. एका हातावर त्याने अमृता व त्याच्या नावाच्या सुरुवातीची इंग्रजी अक्षर काढली. शिवाय मुंबईचा जावई असं देखील शुभंकरच्या हातावर लिहिलं आहे. याचा व्हिडीओ शेअर करत शुभंकर म्हणाला, “हात माझा मेहंदी माझी…रंग मात्र अमृताचा.”

हेही वाचा – Video: रणवीर सिंहपेक्षा जबरदस्त डान्स करतो ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली, पाहा व्हिडीओ

दरम्यान, शुभंकर व अमृताची जोडी ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘कन्यादान’ मालिकेमुळे जमली. या मालिकेत दोघं ऑनस्क्रीन नवरा-बायकोचं काम करत असून खऱ्या आयुष्यातही आता नवरा-बायको होणार आहेत. शुभंकर व अमृताच्या लग्नाची तारीख अद्याप गुलदस्त्यात आहे. पण दोघांचं लवकरच लग्न होणार असल्याचं निश्चित आहे.

Story img Loader