ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं ७४ व्या वर्षी निधन झालं. तळेगाव दाभाडेजवळील आंबी गावात ते भाड्याने राहत होते, तिथेच फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असं पोलिसांनी म्हटलं आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
आणखी वाचा – पत्नी, मुलगा, सून अन्…, असं आहे रवींद्र महाजनींचं कुटुंब
वडिलांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुलगा गश्मीर मुंबईहून तळेगाव दाभाडेला आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. थोड्याच वेळाने त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सोपवला जाईल, अशी माहिती मिळत आहे. तसेच रवींद्र महाजनी यांच्यावर पुण्यातच अंत्यसस्कार केले जाणार आहेत.
आणखी वाचा – “मी स्मार्ट आहे, पण बाबा…”, देखण्या रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरने केलेलं वक्तव्य
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्यावर ५ वाजता नवी पेठे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शवविच्छेदनानंतर कुटुंबियांना मृतदेह सोपवला जाईल, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या मृत्यूचं कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होईल.
आणखी वाचा – “आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”
दरम्यान, महाजनी यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात देखणे अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना असंही म्हटलं जायचं. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.