‘तडप तडप’, ‘याद आऐंगे वो पल’, ‘आँखो मे तेरी’ ही गाणी अजरामर करणार सुप्रसिद्ध गायत म्हणजे केके. त्यांची गाणी आजही चाहत्यांच्या ओठावर असतात. गाण्यांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या केके यांचं गेल्या वर्षी ३१ मे २०२२ला निधन झालं. २६ वर्षांच्या बॉलिवूड करिअरमध्ये केके यांनी तमिळ, तेलुगू, मल्याळमसह इतरही काही भाषांमध्ये गाणी गायली. त्याचबरोबर त्यांनी मराठी भाषेतही गाणं गायलं.

केके यांनी २०१४ साली मराठीतील पहिलं गाणं गायलं होतं. त्यानंतर अंब्रेला या आगामी मराठी चित्रपटात केके यांच्या आवाजातील दुसरं गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे. येत्या ३१ मे रोजी केके यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने ‘अंब्रेला’च्या टीमकडून हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘एकांत हवा’ असे गाण्याचे बोल असून या गाण्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. केके यांनी गायलेलं हे शेवटचं मराठी गाणं आहे.

हेही वाचा>> “लोकशाहीत राहतो, हे फक्त…”, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, ‘झेंडा’ चित्रपटाचा उल्लेख करत म्हणाले…

अभिनेता अभिषेक सेठीया आणि अभिनेत्री हेमल इंगळे यांच्यातल्या प्रेमाची केमिस्ट्री प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळणार आहेच. पण अरुण नलावडे आणि सुहिता थत्ते यांच्या कसदार अभिनयाची मेजवानीही प्रेक्षकांना चित्रपटाचा पुरेपूर आनंद देणारी ठरेल. चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन, संवाद आणि पटकथा लेखन मनोज विशेंनी केलं आहे. ‘स्वरनाद’ प्रस्तुत या चित्रपटाची गाणी मंगेश कंगणे यांनी लिहिली असून ती संतोष मुळेकर यांनी संगीतबद्ध केली आहेत. अंब्रेला हा चित्रपट येत्या ९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader