कलाकार मंडळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कधी व्हिडिओ तर कधी फोटो शेअर असतात. शिवाय दैनंदिन जीवनातील अनुभव सांगत असतात. तसेच आजूबाजूच्या घडणाऱ्या घडामोडींवर स्वतःच परखड मत मांडत असतात. यामुळे काहीदा कलाकार ट्रोल सुद्धा होतात. पण ट्रोलर्सना ते चोख उत्तर देतात.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक साडी नेसलेली चिमुकली दिसत आहे. गालावर हात ठेऊन ही चिमुकली गोड हसताना पाहायला मिळत आहे. या गोड चिमुकलेची वडील हे मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार असून आई प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही चिमुकली नक्की कोण आहे जाणून घ्या…
हेही वाचा – खलनायिकेची भूमिका साकारल्यामुळे कधी प्रेक्षकांचा वाईट अनुभव आला का? रुपाली भोसले म्हणाली, “मला खूप….”
साडी नेसलेली ही चिमुकली अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी आहे. स्वानंदीने हा बालपणीचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. २० वर्षांपूर्वीच्या स्वानंदीच्या या फोटोने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या गोड फोटोवर अभिनेत्री सुरुची अदारकर, मेघा धाडे, निखिल बने अशा अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच “मराठमोळी मुलगी लय भारी”, “क्यूट”, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा – ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर डान्स रील्समुळे ट्रोल; अभिनेत्रीने सुनावले खडे बोल
दरम्यान, स्वानंदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. तसेच तिने ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून रंगमंचावरही पदार्पण केलं. या नाटकात स्वानंदीबरोबर तिची आई प्रिया बेर्डे मुख्य भूमिकेत आहेत.