मराठीतील ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक तसेच दिवगंत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी ट्रोलिंगबद्दल आपलं मत मांडलं आहे. शरद पोंक्षेना त्यांच्या विचारसरणीमुळे ट्रोल केलं जातं, नाना पाटेकरांनाही राजकीय मतं मांडल्याने ट्रोल केलं जातं, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी कलाकार खरंच व्यक्त होतात, असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न त्यांना ‘सिनेमा गली’ला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आला. पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले, “खूप जण व्यक्त होतात, पण त्यांना मर्यादा आहेत. चॅनलच्या, वितरकांच्या, राजकीय मर्यादा आहेत. स्वतंत्रपणे मला वाटतं तसं मी व्यक्त व्हायला लागलो, तर लोक वाळीत टाकतील. शरद पोंक्षे त्याला पाहिजे ती विचारसरणी राबवतो, पण त्याला किती ट्रोल केलं जातं. मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच तुम्हाला विचारायला तुमच्याकडे येत नाही ना. तो बोलतोय, तर त्याला ट्रोल करतात.”

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Vanchit Bahujan Aaghadi Maharashtra Assembly Election Results 2024
वंचितही ईव्हीएमविरोधात आक्रमक, थेट निवडणूक आयोगाला पत्र; विचारले ‘हे’ तीन प्रश्न
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”

पुढे ते म्हणाले, “एखादा भाजपासाठी, एखादा काँग्रेससाठी, एखादा राष्ट्रवादीसाठी काम करत असेल तर त्यांना ट्रोल केलं जातं. पण स्वतंत्र विचारसरणी राबवताना तुमच्यामागे एक मोठा आवाका लागतो, यश लागतं तरंच तुमचं ऐकलं जातं. ज्या क्षणी तुमचा बॅकअप संपतो. तुम्ही इथे काय काम करता, तुमचं काम किती मोठं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्हाला ऐकलं जातं.”

“मराठी सिनेमा ठराविक लोकांच्या हातात”, पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं स्पष्ट मत; ‘त्या’ दोन निर्मात्यांचा उल्लेख करत म्हणाले…

नाना पाटेकरांबद्दल पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले, “नाना पाटेकर आज का ठणकावून सगळीकडे फिरतो? कारण त्याच्याकडे यशाचा मोठा बॅकअप आहे. त्याच्याच जोरावर तो अजित पवारांना ‘हा अजित’ असं म्हणतो. दुसऱ्या कोणाची ताकद आहे का? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे एकेरी उल्लेख करत मी त्यांच्याशी बोललो असं तो म्हणतो. कारण नानाला हिंदी सिनेमाचा मोठा आवाका आहे. ते नसल्याशिवाय तुम्ही इथे किती काळ टिकून राहणार, दोन मिनिटांत बाहेर काढतील तुम्हाला.”

“लक्ष्मीकांतने स्वत:ला संपवलं, बायकोचंही ऐकलं नाही”, चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डेंनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “सुपरस्टार झाल्यावर…”

पुढे ते म्हणाले, “जर आज मी माझी खरी मतं मांडली, लोकांना मी घाबरत नाही म्हणून आता सर्वांबद्दल बोलतोय, पण काही लोक दबकून राहतात. मला कुणी गॉडफादर नाही. मला नाटक करावं वाटलं मी केलं, मला हमालदादा सिनेमा करावासा वाटला, मी प्रोड्यूस केला. मला कुणी ब्रेक द्यावा म्हणून मी थांबत नाही, त्यामुळे मला कुणाची भीती नाही. मला दिलीप कुमारवर सिनेमा करावा वाटला असता तर मी केला असता. मी अनिल कपूरला घेऊ का म्हणून कुणाला विचारायला गेलो नाही, मी घेतलं आणि काम केलं. माझी गोष्ट वेगळी आहे. मी कुणासाठी थांबणार नाही. मला चंद्रमोहिमेवर सिनेमा करावा वाटेल तर मी करेन. भस्म मी केला, तो रिलीज नाही केला, भस्म हा माझा फाइन आर्ट पेंटरचा अनुभव आहे. ते दाखवण्यापासून मला कोणी अडवू शकत नाही, कारण मी टॅक्स रिटर्न स्कीममधून १३ लाख मिळाले तेच वापरले. आज अनुदानासाठी ४० लाख असतील तर त्याचा पुरेपुर फायदा कसा घ्यायचा हे मी दिग्दर्शक म्हणून ठरवलं पाहिजे.”

पती फोटोग्राफर तर सासरे मंत्री, स्वत: राजकुमारी असलेली अभिनेत्री अभिनय सोडून रमली संसारात, पाहा Photos

चित्रपट करताना निर्मात्यांचा विचार करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. “मी जर १५ कोटींचा मराठी सिनेमा केला तर मी त्या निर्मात्याला खड्ड्यात का घालू? मी तर माझे पैसे टाकणार नाही. मी प्रपोजल तयार करणार आणि देऊन जाणार. तो निर्माता मेला तर मला काय फरक पडतो, अशा अॅटिट्यूडने मी कधी नाटक पण केलं नाही. मी जाऊबाई जोरातचे १५० प्रयोग केले, आज काल पाच प्रयोगानंतर दिग्दर्शक दिसत नाहीत. ३५ वर्षांमध्ये मी नऊ सिनेमे केले आणि ५० वर्षांत सात नाटकं लिहिली. का मी दर महिन्याला एक नाटक लिहिलं नाही, मी करू शकलो असतो. निर्मात्याला लोक खूप मागे लागतात, पण तसं करत नाही. मी स्वतःला कलाकार म्हणून खूप मोठा मानतो, मी या मर्यादा पाळत पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

Story img Loader