‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून लक्ष्मीकांत व प्रिया बेर्डे यांच्या लेकाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर त्याने ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सिनेविश्वात आपला जम बसवल्यावर आता अभिनय आपल्या वडिलांचा वारसा चालवत रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.
अभिनय बेर्डेचं पहिलं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाचं पहिलं पोस्टर त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’मधून अभिनय रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. याचं लेखन-दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन याने केलं आहे. या नाटकात एकूण ८ कलाकार व ११ नर्तक आहेत अशी माहिती क्षितिजने नुकत्यात एका मुलाखतीत दिली.
हेही वाचा : Video : पंजाबी गाण्यावर एन्ट्री, फुलांची उधळण अन्…; तापसी पन्नूच्या सिक्रेट लग्नातील पहिला व्हिडीओ आला समोर
अभिनय ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाचं पोस्टर शेअर करत लिहितो, “तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!”
हेही वाचा : ईशा अंबानी-आनंद पिरामलचं आलिशान घर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं विकत, तब्बल ५०० कोटींचा केला करार
अभिनय बेर्डेने शेअर केलेल्या पोस्टवर निखिल बने, सुकन्या मोने, अमृता सुभाष, मुग्धा गोडबोले या कलाकारांनी कमेंट्स करत त्याला या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ३० एप्रिलला असणार आहे.