मराठी चित्रपटातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेला अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादा कोंडके यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटलं की बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना धडकी भरायची. आता पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे.
दादा कोंडके यांच्या सिनेमे पाहत सत्तरच्या दशकातील तरुणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते. दादांच्या सिनेमांनी मराठी सिनेमा गाजवलेल्या काळातील प्रेक्षकांच्या पिढीची नाळ आजही दादांच्या सिनेमाशी जोडलेली आहे. गेल्या ८ ऑगस्ट १९३२ ला जन्मलेल्या दादांचा १९६९ ला ‘ तांबडी माती ’ या सिनेमापासून सुरू झालेला प्रवास १९९४ ला ‘ सासरचं धोतर ’ या सिनेमापर्यंत येऊन थांबला. आता दादांच्या गाजलेल्या सिनेमांची मेजवानी झी मराठीने प्रेक्षकांसाठी आणली आहे.
आणखी वाचा : Video : भरधाव वेगाने ओव्हरटेक, ट्रक पलटी अन् फेरारी कार…; ‘स्वदेस’ फेम अभिनेत्रीच्या कार अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर
विनोदसम्राट दादा कोंडके हे एक असं पर्व होतं, ज्याने मराठी सिनेमाला मातीतल्या अस्सल विनोदीपटाचा परिसस्पर्श दिला. त्या दादांना त्यांच्या ज्युबिलीस्टार ६ सिनेमांद्वारे मानाचा मुजरा करण्यासाठी झी मराठी सुद्धा सज्ज झाली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून दर रविवारी दादा कोंडके यांचे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यानिमित्ताने दादा कोंडके यांच्या अनेक आठवणींनाही उजाळा मिळणार आहे.
आणखी वाचा : “कुशल बद्रिकेचे पुढचे दोन दात खोटे…” प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक खुलासा करत म्हणाला, “रुमाल रक्ताने…”
दादा कोंडके यांचा सिनेमा म्हणजे विनोदाचे अजब रसायन. सहजपणे विनोदी फटकेबाजी म्हणजे दादांचा सिनेमा. त्याही पुढे जाउन दादा कोंडके यांचा सिनेमा कधीच शिळा होत नाही. आता हीच पर्वणी झी मराठी घेऊन आली आहे. ‘वाजवू का’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘मुका घ्या मुका’ अशा सिनेमांचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा घेता येणार आहेत.