गेल्या काही दिवसांपासून देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. आज महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, मावळसह एकूण ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्य माणसांसह अनेक कलाकार मतदान केंद्रावर जात आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच प्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र मत न देताच माघारी परतली आहे. याबद्दल तिने निराशा व्यक्त करत तिच्या सोशल मीडियावर याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा… VIDEO: करीना कपूर आणि सैफने केलं पापाराझींसमोर किस, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “घरात यांना…”

सावनी रविंद्र मतदानासाठी केंद्रावर गेली असता तिला मतदान करू दिले नाही. याबाबत विचारणा केली असता, सावनीचे मतदारांच्या यादीत नावच नसल्याचे आढळून आले. याबाबत सावनीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं, “गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टलवर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज वोटिंग बूथला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही नाव सापडले नाही. (ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे, त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत, पण माझे नाही.”

सावनी रविंद्र यांनी पुढे लिहिलं, “याबद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन एईडी (AED) पर्यायाने वोट करू शकते का, याबद्दल विचारणा केली असता त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले, अत्यंत खेदजनक.”

हेही वाचा… ठरलं तर मग: सायलीच्या भावना दुखावल्याने कुसुम अर्जुनकडे मागणार ‘हे’ वचन; पाहा प्रोमो

सावनीने खेद व्यक्त करत या पोस्टमध्ये महाराष्ट्र सरकारला टॅग केलं आहे. सावनीच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सगळीकडे हेच सुरू आहे, अशी खंत एका नेटकऱ्याने व्यक्त केली. “आता पुढच्या निवडणुकीसाठी पुन्हा नाव नोंदणी करा”, असा सल्ला दुसऱ्याने दिला.

हेही वाचा… “मी इतकी ढसाढसा रडले…”, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ शूटिंगच्या पहिल्याच दिवशी मृणाल दुसानीसला झालेले अश्रू अनावर, अभिनेत्री म्हणाली…

सावनीसारखाच अनुभव अभिनेता सुयश टिळक यालादेखील आला आहे. त्यालाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही.

दरम्यान, मतदान सुरू झाल्यापासून अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णी, मनोज आगाशे, सावनी शेंडे, बेला शेंडे , गायत्री दातार अशा अनेक कलाकारांनी आपलं मौल्यवान मत दिलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election singer savaniee ravindrra could not able to vote dvr