Loksatta Adda Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा’ या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या सदाबहार चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता येत्या २० सप्टेंबरला या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे या दमदार स्टारकास्टने ‘लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डा’ला उपस्थिती लावली होती. यावेळी संवाद साधताना या कलाकारांनी चित्रपटाविषयीचे अनेक खुलासे केले आणि सर्वांना रंजक किस्से सांगितले.

चित्रपटाच्या ( Navra Maza Navsacha 2 ) ट्रेलरमध्ये दाखवली जाणारी बालगणेशाची मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेते. बाप्पाच्या या मूर्तीची निवड कोणी केली असा प्रश्न विचारताच सगळ्या कलाकारांनी सुप्रिया पिळगांवकरांकडे बोट दाखवलं. खरंतर सुरुवातीला बाप्पाची दुसरी मूर्ती निश्चित करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी सुप्रिया यांच्या मनात बालगणेशाच्या रुपात मूर्ती हवी असं आलं. त्यांनी त्यामागची भावना व संकल्पना सचिन यांना सांगितली. यानंतर सुप्रिया यांच्या पुढाकारामुळे पुढे जाऊन सर्वानुमते बालगणेशाच्या मूर्तीची निवड करण्यात आल्याचं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं.

kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Nitish Chavan
‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने शेअर केला ईशा संजयबरोबर व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नाव सांगू का शीतलला?”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा : Video : आधी ‘हिरवा निसर्ग’ आता ‘सुपारी फुटली’! ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये आहे सोनू निगमचं खास गाणं, व्हिडीओ आला समोर

पहिल्या भागात प्रेक्षकांना एसटी बसने गणपती पुळेपर्यंतचा प्रवास पाहायला मिळाला होता. त्यामुळे यंदा प्रवासासाठी कोकण रेल्वे का निवडली यावर सचिन व सुप्रिया म्हणाले, “प्रवास महत्त्वाचा…आणि कोकण रेल्वेने प्रवास करण्यामागे एक खास कारण आहे. या मंडळींना सर्व लोकांबरोबर प्रवास करणं खूप महत्त्वाचं होतं. आता हे का महत्त्वाचं आहे ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर कळेल. याशिवाय एसटी असेल तर आधीची पुनरावृत्ती होईल..त्यामुळे कोकण रेल्वे निवडणं. हा देखील यामागचा उद्देश होता. त्या चित्रपटात बस होती इथे ट्रेन आहे. तिकडे कंडक्टर होता, तर इथे टिसी आहे. प्रवास ही संकल्पना कायम राहणार आहे. कारण, प्रत्येकासाठी जीवनात प्रवास महत्त्वाचा असतो.”

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : ८०० कोटींचे हिरे, बाप्पाचा कौल अन्…; यंदा कोकण रेल्वेने होणार गणपतीपुळेचा प्रवास! पाहा धमाकेदार ट्रेलर

पाहा लोकसत्ता ऑनलाइनचा डिजिटल अड्डा ( Navra Maza Navsacha 2 )

दरम्यान, अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या ( Navra Maza Navsacha 2 ) चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader