Loksatta Digital Adda: गेल्या काही दिवसांपासून सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. साने गुरुजी यांच्या अजरामर ‘श्यामची आई’ या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असून यामध्ये साने गुरुजींचे इतरही बरेच पैलू उलगडले जाणार आहेत. चित्रपटाच्या गाण्यांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
यानिमित्त ‘श्यामची आई’ चित्रपटांच्या संपूर्ण टीमने लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘डिजिटल अड्डा’ या कार्यक्रमात हजेरी लावली व मनमोकळ्या गप्पा मारल्या. या मुलाखतीदरम्यान शूटिंगदरम्यानचे किस्से, साने गुरुजींसारख्या महान व्यक्तिमत्त्वावर चित्रपट करताना आलेलं दडपण, एकूणच जुना काळ उभा करण्यामागील गंमती जमती अशा बऱ्याच विषयांवर या संपूर्ण टीमने भाष्य केलं. या चित्रपटात ओम भूतकर, गौरी देशपांडे, संदीप पाठक हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
अशा अनेक कलाकारांच्या मुलाखती पाहण्यासाठी लोकसत्ता ऑनलाइनच्या ‘LoksattaLive’ या युट्यूब चॅनेलला भेट द्या आणि सब्सक्राइब करा.