२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मदार’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचाही पुरस्कारही या चित्रपटाने पटकावला आहे. याच निमित्ताने ‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर आणि चित्रपटाच्या टीमने लोकसत्ता ऑनलाईनला मुलाखत दिली.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.