आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘लाईफलाईन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ फेम अण्णा नाईक अशोक सराफ यांच्याबरोबर या चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या महाराष्ट्राचे लाडके ‘अण्णा’ माधव अभ्यंकर यांची व्यक्तिरेखा समोर आली आहे. पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रपटातील माधव अभ्यंकर यांच्या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. आपल्या विचारांवर, मतांवर ठाम असणाऱ्या एका खंबीर किरवंताची ते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.

आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता ‘लाईफलाईन’मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

Chhagan Bhujbal Said This Thing About Mahatma Phule
Chhagan Bhujbal : “महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, त्यांनी…” छगन भुजबळ यांचं महत्त्वाचं वक्तव्य
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र
Loksatta vyaktivedh Madhura Jasraj Paraphrase of V Shantaram autobiography movie
व्यक्तिवेध: मधुरा जसराज
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
guru gochar diwali 2024
दिवाळीनंतर गुरु ग्रह करणार चंद्राच्या नक्षत्रात प्रवेश! राजासारखे जीवन जगतील ‘या’ राशींचे लोक
Exploding notes in Anand Ashram Dighe confidant Nandkumar Gorule was enraged
आनंद आश्रमात नोटांची उधळण, दिघे साहेबांचे विश्वासू नंदू गोरूले संतापले, म्हणाले…
NCP ajit pawar group,Dharmarao Baba Atram eldest daughter join sharad pawar group
राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याच्या घरातच फूट, मुलगी लवकरच शरद पवार गटात…सोबत जावयानेही….

हेही वाचा – Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

आपल्या भूमिकेबद्दल माधव अभ्यंकर म्हणतात, ”देव आयुष्य देतो, तर किरवंत मोक्ष देतो, अशा धार्मिक विचारसरणीची ही व्यक्तिरेखा असून त्याचा भक्ती, श्रद्धा यांवर जास्त विश्वास आहे. प्रत्येक धार्मिक क्रियेमागे काही कारण असते, हे पटवून देणारी ही व्यक्तिरेखा आहे. यापूर्वी मी अनेक भूमिका साकारल्या परंतु अशा प्रकारची भूमिका मी प्रथमच साकारत आहे. त्यातही अशोक सराफ यांसारखे मातब्बर कलाकार माझ्यासोबत आहेत. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. तरुण दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभवही कमाल होता. हल्लीच्या तरुणाईचा दृष्टिकोन, त्यांची कामाची पद्धत हेसुद्धा शिकण्यासारखे आहे.”

lifeline
‘लाईफलाईन’ मध्ये माधव अभ्यंकर दिसणार किरवंताच्या भूमिकेत (फोटो – पीआर)

हेही वाचा – “हृतिक रोशन अन् माझी मुलगी आता…”, सुझान खानच्या आईचं वक्तव्य; म्हणाल्या, “दोघेही आपल्या मुलांवर…”

क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘लाईफलाईन’ या चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या मुख्य भूमिका आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाचे साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शिन केले असून राजेश शिरवईकर यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांचा आवाज लाभला आहे. ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरलेला हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.