माधुरी दीक्षित व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांची जोडी सध्या ‘पंचक’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट ५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. सध्या माधुरी व श्रीराम नेने या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतीच या दोघांनी पुण्यातील एका चित्रपटगृहात हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरी दीक्षितला यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी उखाणा घेण्याची विनंती केली. अभिनेत्रीने देखील सगळ्यांच्या आग्रहास्तव खास मराठीत उखाणा घेतला. नेने जोडप्याचे मराठीतील उखाणे ऐकून प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच आनंद व्यक्त केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री घेणार ‘कलर्स मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका

माधुरी उखाणा घेत म्हणाली, “पुणे तिथे काय उणे…इथे तर सर्वच झकास श्रीरामाचं नाव घेते पंचक बघणाऱ्यांसाठी खास” बायकोचा हा मराठी उखाणा ऐकून डॉ. नेने म्हणाले, “भाजीत भाजी मेथीची माधुरी माझ्या प्रितीची” दोघांचे मराठी उखाणे ऐकून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं.

हेही वाचा : ना गाडी, ना विमान…; देवदर्शनाला निघालेल्या बांदेकर कुटुंबीयांनी केला रेल्वे प्रवास! साधेपणाचं सर्वत्र होतंय कौतुक

माधुरी दीक्षित व डॉ. नेनेंच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “माझी मराठमोळी माधुरी”, “मला माधुरी खूप आवडते”, “दोघांनी सुंदर उखाणे घेतले” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘पंचक’मध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आशिष कुलकर्णी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit and dr shriram nene take marathi ukhana video viral sva 00