‘नटरंग’ चित्रपटातील प्रत्येक लावणीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या चित्रपटामध्ये सुरुवातीलाच अभिनेत्री अमृता खानविलकर ‘आता वाजले की बारा’ या लावणीवर थिरकली होती. बेला शेंडेचा आवाज, अजय-अतुलचं संगीत अन् अमृताचा डान्स अशा तिन्ही गोष्टींनी ही लावणी परिपूर्ण आहे. आजही प्रत्येक समारंभात ‘आता वाजले की बारा’ ही लावणी वाजवली जाते. अगदी बॉलीवूडच्या धकधक गर्लला सुद्धा या गाण्यावर थिरकण्याचा मोह आवरता आलेला नाही.

माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. दर आठवड्यात या कार्यक्रमात प्रेक्षकांना नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात. अशातच या शोमधील स्पर्धक आणि उत्तम नृत्यांगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैष्णवी पाटीने शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : Video : ‘नाच गं घुमा’ गाण्यावर स्वप्नील जोशीच्या मुलांचा डान्स! व्हिडीओवर मुक्ता बर्वेसह नम्रता संभेरावने केली खास कमेंट

वैष्णवीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित ‘आता वाजले की बारा’ लावणीवर जबरदस्त डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. पोपटी रंगाची वेस्टर्न टच असलेली सुंदर अशी डिझायनर साडी, नाकात नथ असा मराठमोळा लूक करून माधुरी ‘आता वाजले की बारा’वर थिरकल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

हेही वाचा : ‘येड लागलं प्रेमाचं’ : स्टार प्रवाहवर सुरू होणार नवीन मालिका! बैलगाडा शर्यतीचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, माधुरीबरोबर एकत्र रंगमंचावर डान्स करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं सांगत वैष्णवीने धकधक गर्लला व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘My inspiration’ असं म्हटलं आहे. सध्या सर्वत्र माधुरीच्या डान्सची चर्चा आहे. आताच्या घडीला इन्स्टाग्रामवर या व्हिडीओला जळळपास सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Story img Loader