अभिनेत्री माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या धकधक गर्लने एका मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. ‘पंचक’ असं या चित्रपटाचं असून हा चित्रपट ५ जाानेवारी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माधुरीने पतीसह आज सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. या चित्रपटाच्यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह ठिकठिकाणी मुलाखत देताना दिसत आहे. आज माधुरीने पतीसह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पांच दर्शन व शुभाशिर्वाद घेतले. यावेळी माधुरीच्या चाहत्यांनी मंदिराबाहेर एकच गर्दी केली होती. यासंबंधिचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
‘पंचक’ या चित्रपटात नव्या-जुन्या ताकदीच्या कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आदिनाथ कोठारे, आनंद इंगळे, सागर तळाशीकर, तेजश्री प्रधान, दीप्ती देवी, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर अशी तगडी कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जयंत जठार आणि राहुल आवटे यांनी सांभाळली आहे.
आता माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने निर्मित ‘पंचक’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो? बॉक्स ऑफिसवर किती काळ टिकतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.