अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवारला तुम्ही ‘रान बाजार’ वेब सीरिजमध्ये पाहिलं असेल. या सीरिजमध्ये तिने प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारली होती. माधुरी मुळची साताऱ्याची आहे. गरीब घरात जन्मलेल्या माधुरीने स्वतःच्या हिमतीवर मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“कॉलेजला जाताना एका मुलाने शिट्टी मारली अन्…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मी बॅगमधून…”

माधुरी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहते. याशिवाय माधुरी अनेक मुलाखतीही देत असते. मुलाखतीत ती तिच्या आयुष्याबद्दल खुलासे करते. नुकत्याच एका मुलाखतीत माधुरीने तिला मिळालेल्या पहिल्या लव्ह लेटरबद्दल सांगितलं.

झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात गेलं बालपण, आताही भाड्याच्या घरात राहते माधुरी पवार; ‘ड्रीम होम’बद्दल म्हणाली, “मला कौलारू…”

माधुरी म्हणाली, “पहिलं लव्ह लेटर मला चौथीत असताना आलं होतं. त्यावेळेस लव्ह लेटर वगैरे काही कळायचं नाही, त्यामुळे मी ते घरी दिलं होतं. घरच्यांना कळाल्यावर शाळेत खूप राडे झाले होते. कळताना आलेलं लव्ह लेटर एका मुलाने मी आठवीत असताना दिलं होतं. तुषार नावाच्या एका लेटर दिलं होतं, ते मी अजूनही जपून ठेवलंय. तेव्हा मला चश्मा होता आणि त्या मुलाने चश्मा असलेल्या मुलीच्या फोटोचं चित्र लव्ह लेटरवर काढलं होतं.”

दरम्यान, माधुरीने पहिल्या प्रपोजबद्दलही सांगितलं. ओंकार नावाच्या मुलाला एकदा प्रपोज केलं होतं, असं माधुरी म्हणाली. माधुरीच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील भूमिकांसाठी ओळखली जाते.