अप्रतिम नृत्यांगना आणि उत्तम अभिनेत्री असलेल्या माधुरी पवारने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, तिने कठीण काळही पाहिला आहे. तिने झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या अभिनयक्षेत्रात काम करून माधुरी स्वतःच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. याच मुलाखतीत माधुरीने तिला लग्नासाठी कसा मुलगा हवा? याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात गेलं बालपण, आताही भाड्याच्या घरात राहते माधुरी पवार; ‘ड्रीम होम’बद्दल म्हणाली, “मला कौलारू…”

माधुरी म्हणाली, “मी लग्न करेन की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. मला आता तरी लग्न करावं असं वाटत नाही. कारण करिअर आणि इतर जबाबदाऱ्या खूप आहेत. या सगळ्यात मला एक जोडीदार मिळाला तर त्याला उत्तम मराठी यायला हवं. कारण माझं मराठीवर खूप प्रेम आहे. त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत असावा. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्याला माहीत असावी. तो स्त्रीचा, तिच्या मतांचा आदर करणारा असावा. तो त्याच्या आई-वडिलांचा आदर करणारा असावा. जर तो त्याच्या पालकांचा आदर करत असेल तरच तो माझ्या आई-वडिलांचा आदर करू शकेल.”

“कॉलेजला जाताना एका मुलाने शिट्टी मारली अन्…”, मराठी अभिनेत्रीने सांगितला किस्सा; म्हणाली, “मी बॅगमधून…”

पुढे माधुरी म्हणाली, “तो खूप श्रीमंत असावा, प्रचंड पैसा कमावणारा असावा असं नाही. माझाही साड्या आणि चपला शिवाय फार खर्च नाही. त्यामुळे जेमतेम कमावणारा असेल तरीही चालेल. दिसायला तो खूप सुंदर असावा असंही नाही. मला सावळी मुलं खूप आवडतात. मीही सावळीच आहे, त्यामुळे सावळी, गव्हाळ रंगाची मुलं छान वाटतात. कारण त्यांचा स्मार्टनेस खूप अफलातून असतो. मुलाचे केस चांगले असावे, माझ्यापेक्षा थोडा उंच असावा आणि आयुष्यभर माझं ऐकणारा असावा.”

माधुरी स्वतःच्या स्वभावाबद्दल म्हणाली, “मी टॉम बॉयसारखी पण आहे, थोडी बालिशही आहे, गंभीरही आहे, परखड मतं मांडणारी आहे. मी स्वतःचाच विचार करते तेव्हा मला वाटतं की मला सांभाळणं खूप कठीण आहे. माझ्याशी लग्न करणं ही मोठी रिस्क आहे. अर्थात लग्न केल्यानंतर तो माझ्याबरोबर खूशही असेल,” असं माधुरी म्हणाली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri pawar partner expectations for marriage want boy who respect and value women hrc
Show comments