राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं. नव्या पिढीपर्यंत आपली प्राचीन संस्कृती पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. यावेळी “स्वयें श्रीराम प्रभू ऐकती”, “राम जन्मला गं सखे”, “चला राघवा चला”, “स्वयंवर झाले सीतेचे” अशा अजरामर गीतांचं सादरीकरण करण्यात आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमात आलिशान सेट, आकर्षक देखावे व भव्य विद्युत रोषणाईने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी गीत, नाट्य, नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील प्रसंगांचे सादरीकरण करण्यात आले.

“रामायण हे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. रामायणातील प्रत्येक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे” असं यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : शिवानी सुर्वे झाली ननावरेंची सून! आधी गुपचूप साखरपुडा अन् आज लग्नाच्या बेडीत; थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेता ललित प्रभाकरने प्रभू श्रीरामांची, मृण्मयी देशपांडेने सीतामातेची, तर लक्ष्मणाची भूमिका अभिनेता शुभंकर परांजपेने साकारली होती. याशिवाय रामायणातील प्रसंग सादर करताना अभिनेता नकुल घाणेकरने रावणाची, तर अभिजीत केळकरने अग्निदेवाची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमात सगळ्याच मराठी कलाकारांनी लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : Video: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या हळदीचा व्हिडीओ आला समोर, थिरकताना दिसले ‘बिग बॉस मराठी’चे कलाकार

दरम्यान, या महाकाव्यात सहभागी झालेल्या मृण्मयी, अभिजीत या कालाकारांनी या कार्यक्रमाचे काही खास क्षण त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यावर “सुंदर कार्यक्रम. श्रवणीय तर होताच आणि तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला अधिक प्रेक्षणीय केलं,” असं म्हणत वैशाली सामंतने सर्व कलाकारांचे कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cultural department organized geet ramayan show marathi actors performed these roles sva 00
Show comments