महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० म्हणजेच आजपासून बरोबर ६४ वर्षांपूर्वी करण्यात आली. १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण असतं. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि राज्याचा समृद्ध वारसा समजून घेण्यासाठी हा दिवस दरवर्षी मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. याशिवाय १ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून देखील साजरा करण्यात येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंडळींनी सुद्धा आपल्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. अभिनेत्री मिताली मयेकरने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. तिच्यासह सिद्धार्थ चांदेकर, गायक रोहित राऊत, त्याची पत्नी गायिका जुईली जोगळेकर, नचिकेत लेले या सर्वांनी मिळून आपल्या मराठी प्रेक्षकांना एका अनोख्या अंदाजात महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : ‘रमा-राघव’च्या सुखी संसारात नवीन विघ्न! ‘अग्गबाई सुनबाई’ फेम अभिनेत्याची मालिकेत होणार एन्ट्री, पाहा नवीन प्रोमो

रोहित, जुईली, नचिकेत, सिद्धार्थ व मिताली यांनी “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” हे गौरव गीत स्वत:च्या आवाजात सादर केलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना मुंबई दर्शन घडतं. याशिवाय या चारही कलाकारांनी खास पारंपरिक साज करत हे गीत सादर केलं आहे. मिताली आणि जुईलीने साड्या नेसून, नाकात सुंदर नथ, दागिने परिधान करून खास लूक केला आहे. तसेच सिद्धार्थ, रोहित यांनी नचिकेत यांनी देखील सदरा परिधान करुन मराठमोळा लूक केला आहे.

“धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी…एवढ्या जगात माय मानतो मराठी! मराठी आमचं जगणं. मराठी आमचं अस्तित्व. मराठी आमचा भूतकाळ. मराठी आमचं भविष्य. अभिमानाने मराठी बोलणाऱ्या, मराठी जगणाऱ्या प्रत्येकाला आमच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या मनापासून शुभेच्छा. जय महाराष्ट्र!” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा : Video : पोपटी साडी, नाकात नथ अन्…; ‘वाजले की बारा’ लावणीवर माधुरी दीक्षितने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, या पाच कलाकारांनी सादर केलेल्या व्हिडीओवर सध्या कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. नेटकऱ्यांसह अमृता खानविलकर, गायत्री दातार, हेमांगी कवी यांनी कमेंट्स करत या व्हिडीओचं कौतुक केलं आहे. “जय महाराष्ट्र”, “तुम्ही सुंदर गायलात पण, दिसताय पण कमाल”, “खूप खूप सुंदर अभिमान वाटतो” अशा प्रतिक्रिया या कलाकार मंडळींच्या व्हिडीओवर आल्या आहेत. अवघ्या तासांभरातच या व्हिडीओला लाखाच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra din 2024 siddharth chandekar mitali mayekar rohit raut juilee joglekar and nachiket lele sung special song sva 00