Maharashtra Election 2024 : राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी मतदान होतं आहे. महायुती, महाविकास आघाडी या दोन युत्यांसह अनेक पक्ष विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. या अनेक पक्षातील एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पुढीच पाच वर्षांसाठी सत्तेच्या चाव्या मतदार कोणाच्या हाती देणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सर्व कलाकार मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्यासाठी आवाहन करत आहेत.

Congress Priyanka Gandhi held road show in two constituencies in Nagpur on Sunday
प्रियंका गांधींचा आज नागपुरात या दोन ठिकाणी ‘रोड-शो’
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar: शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजित पवारांचं मोठं विधान; भाषणात म्हणाले, “दीड वर्षांनी ते…”!
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah : “इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी आता कलम ३७०…”, अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?

हेही वाचा – AR Rahman Divorce : २९ वर्षांचा संसार मोडला; ए. आर. रेहमान व सायरा बानू होणार विभक्त, जारी केलं निवेदन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, सायली संजीव, मंदार चांदवडकर, तेजस्विनी पंडित, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचं कर्तव्य पार पडलं आहे. यासंदर्भात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या कुटुंबासह मतदान केलं. याचे फोटो शेअर करत तिने एक चारोळी केली. “करा आज योग्य selection…Today is the day of election…समाजात हवं असेल जर perfection…तर करू नका या संधी चं rejection”, अशी चारोळी सोनालीने केली.

हेही वाचा – Video: हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी अन् बरंच काही…; भगरे गुरुजींच्या मुलाच्या लग्नसोहळ्यातील Unseen व्हिडीओ पाहा

लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, लेखक हेमंत ढोमेने मतदान केल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने शाईचा बोट दाखवतानाचा फोटो शेअर करून लिहिलं आहे, “माझं मत…ऐक्यासाठी… विकासासाठी… भयमुक्त सुरक्षित वातावरासाठी! माझं मत शेतकऱ्यांसाठी… दुर्बल घटकांसाठी! माझं मत जातीय सलोख्यासाठी… महाराष्ट्रधर्मा साठी! शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी!”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मतदानाचा हक्क बजावला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिलं की, मी मतदान केलं. तुम्ही?…लक्षात ठेवा, बोटं उगारायचा अधिकार हा बोटावर शाई लावल्यावरच मिळतो. आज मतदानाचा हक्क प्राधान्याने आणि जबाबदारीने बजावावा. तसंच अभिनेते सुनील बर्वे यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं आहे. त्यांनी फोटो शेअर करत लिहिलं, “आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं. आता पुढील पाच वर्ष, आपण फसवले गेलो, ही भावना मनात न येता, सुखा-समाधानाची जावोत हीच राज्यकर्त्यांकडून अपेक्षा.”

हेही वाचा – कपाळावर टिकली नव्हती म्हणून वंदना गुप्तेंनी…; सुलेखा तळवलकरांनी सांगितला स्वतःच्या लग्नातला किस्सा, म्हणाल्या, “माझी सासूबाई इतकी उतावळी…”

दरम्यान, बॉलीवूडच्या कलाकारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अभिनेता अक्षय कुमार, फरहान अख्तर, तमन्ना भाटिया, राजकुमार राव, रितेश देशमुख, सोनू सूद यांनी मतदान केलं आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.