दिग्दर्शक केदार शिंदे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. नुकतंच शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईंना हा चित्रपट कसा वाटला, याबद्दलची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात शाहीरांची भूमिका अंकुश चौधरीने साकारली आहे. तर या चित्रपटात सना शिंदे ही शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकतंच केदार शिंदेंनी याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “हा माझा पहिला चित्रपट आणि तिचा प्रतिसाद…” सना शिंदेच्या पोस्टने वेधलं लक्ष
केदार शिंदे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. यात ते त्यांची आजी म्हणजेच शाहिरांची दुसरी पत्नी राधाबाईं यांची गळाभेट घेताना दिसत आहे. याला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर प्राजक्ता माळीच्या भाचीने ठरला ठेका, म्हणाली “नाच येत नसेल…”
“आणि ही प्रतिक्रिया होती.. मालती कदम अर्थात श्रीमती राधाबाई साबळे यांची. महाराष्ट्र शाहीर पाहिला असेल तर लागलीच लक्षात येईल. पाहिला नसेल तर आजच तिकीट काढून पाहा. तरच या लाख मोलाच्या जादू की झप्पी चे महत्व समजेल”, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, निर्मिती सावंत यांसह अनेक कलाकार हे महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.