गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटाचं पोस्टर, गाणी प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अंकुशच्या कामाचं कौतुक होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून अंकुश या चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. ढोलकी वाजवण्याची कलाही त्याने आत्मसात केली. शिवाय त्याच्या लूकवर विशेष मेहनत घेतली. याचबाबत अंकुशची पत्नी दीपा चौधरीने भाष्य केलं आहे. तिने अंकुशच्या मेहनतीचं कौतुक केलं. तसेच ट्रेलर पाहिल्यानंतर ती खूश झाली.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mrunal dusanis sukhachya sarini he man baware marathi serial again on air
मृणाल दुसानिसची ४ वर्षांपूर्वीची सुपरहिट मालिका पुन्हा सुरू होणार! ‘कलर्स मराठी’ने शेअर केली मोठी अपडेट
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

आणखी वाचा – “शेतीच करत राहिलो असतो तर…” ‘सैराट’नंतर तानाजी गालगुंडेने केली पायाची सर्जरी, म्हणाला, “माझे दोन्ही पाय…”

आणखी वाचा – “मी वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि…” सई ताम्हणकरने सांगितली ‘ती’ कटू आठवण, म्हणाली, “त्यांचं निधन झालं तेव्हा…”

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दीपा म्हणाली, “अंकुशने वजन जेव्हा कमी केलं तेव्हा सगळे विचारत होते, तू वजन कमी का केलं?. मात्र त्यावेळी आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही. ढोलकी वाजवायला तो शिकला. गाणी गायचा. बाथरुममध्येही तो गाणी गात होता. आम्ही विचार करायचो की, याचं नेमकं काय सुरू आहे?”.

आणखी वाचा – Video : “छत्रपती शिवाजी महाराजांची उंची किती होती?” अप्पीचं उत्तर ऐकून नेटकरीही भारावले, म्हणाली, “इतिहासकारांनी वेगवेगळे अंदाज लावले आणि…”

“मलाही त्याच्या या चित्रपटाबाबत आधी काहीच माहित नव्हतं. जेव्हा मला केदार शिंदे यांचा फोन आला तेव्हा त्यांनी मला या चित्रपटाबाबत सांगितलं. अंकुश स्वतःहून कोणती गोष्टी सांगत नाही हा त्याचा स्वभाव आहे. पण तीन वर्षे त्याने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो याच गोष्टीच्या पाठी होता. सतत या चित्रपटाचाच विचार तो करत होता. चित्रपटाचा ट्रेलर मी पाहिल्यानंतर त्याची मेहनत माझ्या डोळ्यासमोरुन गेली. त्याने खूप कष्ट केले आहेत”. येत्या २८ एप्रिल हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.