‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. मराठी मनोरंजन विश्वात हा पुरस्कार सोहळा प्रतिष्ठेचा समजला जातो. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसंदर्भात विविध पुरस्कार या सोहळ्यात दिले जातात. त्यामुळे यंदा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’मध्ये कोण बाजी मारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली आहे.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. लवकरच या सोहळ्याचं प्रक्षेपण टीव्हीवर करण्यात येणार आहे. परंतु, तत्पूर्वी काही विजेत्यांची नावं समोर आली आहेत. सयाजी शिंदे यंदाचे सर्वोत्कृष्ट खलनायक ठरले आहेत. तर महाराष्ट्राची फेवरेट सहायक अभिनेत्री या पुरस्कारावर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी आपलं नाव कोरलं आहे. ‘सुभेदार’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.

Ajit Pawar Sabha Mohol, Ajit Pawar news,
अजित पवारांकडून करमाळ्यात आमदार संजय शिंदे यांचा प्रचार, महायुती धर्माला कोलदांडा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Sahitya Lifetime Achievement Award to dr Salunkhe and Social Work Award to Javadekar
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे शरद जावडेकर यांना समाजकार्य विशेष पुरस्कार
udaysingh Rajput
‘निष्ठावान’ अशी प्रतिमा उदयसिंह राजपूत यांना तारू शकेल ?
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Kolhapur North Constituency Assembly Election 2024 Congress candidate Madhurimaraj Chhatrapati withdraws from the election
मधुरिमाराजे छत्रपतींच्या माघारीने काँग्रेसची नाचक्की; पक्षांतर्गत गोंधळ, नेत्यांमधील वादाने पक्ष प्रचारात पिछाडीवर
BJP and RSS cannot decide what color is the page of constitution says Nana Patole
संविधानाच्या पृष्ठाचा रंग कोणता हे भाजप, संघ ठरवू शकत नाही; नाना पटोले म्हणतात,‘ भाजपचा जळफळाट कारण…’

हेही वाचा : पारंपरिक लेहेंग्यावर स्निकर्स घालून थिरली श्रद्धा कपूर; ‘मुझसे शादी करोगी’ गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा Video

मृणाल कुलकर्णी याविषयी लिहितात, “मनापासून धन्यवाद ! ‘महाराष्ट्राची फेवरेट कोण’साठी माझी निवड केलीत…शतशः आभार! दिग्पाल लांजेकर तू शिवराय अष्टक मधल्या प्रत्येक चित्रपटात मला वेगळी छटा अभिनित करता येईल याचं भान ठेवतोस.. त्यामुळेच सतत काही नवीन करण्याची इच्छा होते.. हा पुरस्कार तुला आणि अष्टकातल्या प्रत्येकाला!” या सोहळ्याला मृणाल कुलकर्णींसह त्यांचा लेक व सूनेने हजेरी लावली होती.

हेही वाचा : Video : आयरा खानची नणंद आहे ‘ही’ मराठी अभिनेत्री, लग्नात सासूबाईंनी दाखवली नुपूर शिखरेची मानलेली बहीण

shivani rangole
शिवानी रांगोळेची पोस्ट

सासूबाईंना पुरस्कार मिळाल्यानंतर शिवानीने खास पोस्ट शेअर करत त्यांचं कौतुक केलं आहे. “महाराष्ट्राची फेवरेट सहायक अभिनेत्री… लव्ह यू” असं म्हणत शिवानीने मृणाल कुलकर्णींचा पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो शेअर केला आहे. दरम्यान, यावर्षी पुरस्कार सोळ्यात बाजी मारण्यासाठी ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’, ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘नाळ २’, ‘झिम्मा २’, ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळत आहे.