Maharashtracha Favorite Kon Awards : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या वर्षभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रात भरभरून प्रतिसाद मिळाला. २०२२ च्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. नुकत्याच पार पडलेल्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात देखील ‘वेड’ चित्रपटाचा जलवा पाहायला मिळाला.

‘वेड’ चित्रपटाने एक दोन नव्हे तर तब्बल ९ पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. हा दिग्दर्शक म्हणून रितेशचा पहिला चित्रपट होता, तर त्याची पत्नी जिनिलीयाने ‘वेड’च्या निमित्ताने अभिनेत्री म्हणून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं.

हेही वाचा : मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे! थाटामाटात पार पडला ‘स्वाभिमान’ मालिकेतील अभिनेत्रीचा विवाहसोहळा

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ सोहळ्याला रितेश-जिनिलीयाने जोडीने उपस्थिती लावली होती. यावेळी रितेशचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मान करण्यात आला. अभिनेता म्हणाला, “पहिली व्यक्ती जिने मला, मी दिग्दर्शक होऊ शकतो असं सांगितलं ती म्हणजे माझी बायको जिनिलीया. त्यामुळे माझा हा दिग्दर्शक म्हणून पहिला पुरस्कार जिनिलीया फक्त तुमच्यासाठी!”

रितेशने दिग्दर्शनासाठी मिळालेल्या पुरस्काराचं संपूर्ण श्रेय पत्नीला दिलं. यावेळी प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीने एकमेकांना घट्ट मिठी मारत प्रेम व्यक्त केलं. सध्या जिनिलीया-रितेशचा हा रोमँटिक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या सोहळ्याला देशमुखांच्या सुनेने लाल रंगाची साडी नेसली होती. तर, रितेशने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

हेही वाचा : इच्छामरणाचा अधिकार मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट

दरम्यान, रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाने ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (मुंबई फिल्म कंपनी), ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ (रितेश देशमुख), ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (रितेश), ‘सर्वोत्कृष्ट गाणं’ ( सुखं कळले ), ‘सर्वोत्कृष्ट गायक’, ‘सर्वोत्कृष्ट गायिका’, ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चेहरा’ (जिनिलीया), ‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर'( रितेश ) अशा नऊ महत्त्वाच्या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.

Story img Loader