मनोरंजन विश्वातील मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या झी मराठीचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा काल, १८ फेब्रुवारीला पार पडला. गेल्या वर्षभरात प्रदर्शित मराठी चित्रपटांना आणि संबंधित विभागांना सन्मानित करणारा हा पुरस्कार मोठ्या दिमाखात झाला. कोणत्या अभिनेत्याला व चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राला वेड लावणारा रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाला सर्वाधिक पुरस्कार मिळाले. या चित्रपटाला तब्बल सात पुरस्कार मिळाले. तसेच सर्वाधिक पुरस्कारने अभिनेता रितेश देशमुखला गौरविण्यात आले. महाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आयकॉन, अभिनेता आणि दिग्दर्शक हे तीन पुरस्कार रितेशला मिळाले. तसेच त्याची पत्नी जिनिलीया ही देखील सर्वाधिक पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री ठरली. तिला महाराष्ट्राची फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इअर आणि अभिनेत्री हे दोन पुरस्कार मिळाले.

हेही वाचा – “मी माझं आयुष्य…”, लूकवरून ट्रोल करणाऱ्यांना आयशा टाकियाने दिलं चांगलंच उत्तर, म्हणाली…

याशिवाय ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचा विशेष योगदान सन्मान करण्यात आला. अलका कुबल, नीना कुलकर्णी, प्रिया बेर्डे, सुकन्या मोने यांच्या हस्ते आशा काळे यांना सन्मानित करण्यात आलं. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ २०२३चे मानकरी कोण-कोण ठरले? पाहा

  • महाराष्ट्राचे फेवरेट गीत (बाह्य चित्रपट विभाग) – नऊवारी पाहिजे, संजय राठोड
  • महाराष्ट्राची फेवरेट गायिका – श्रेया घोषाल, सुख कळले (वेड)
  • महाराष्ट्राचा फेवरेट गायक – अजय गोगावले, वेड तुझा (वेड)
  • महाराष्ट्राचे फेवरेट गीत – सुख कळले, अजय-अतुल (वेड)
  • विशेष योगदान सन्मान – आशा काळे
  • महाराष्ट्राचा फेवरेट कोण विशेष पुरस्कार – मृणाल ठाकूर
  • महाराष्ट्राची फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इअर – जिनिलीया देशमुख
  • महाराष्ट्राची फेवरेट सहाय्यक अभिनेत्री – मृणाल कुलकर्णी (सुभेदार)
  • महाराष्ट्राचा फेवरेट सहाय्यक अभिनेता – नागराज मंजुळे (घर बंदूक बिरयानी)
  • महाराष्ट्राचा फेवरेट खलनायक – सयाजी शिंदे (घर बंदूक बिरयानी)
  • महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता (समीक्षक पसंती पुरस्कार) – जितेंद्र जोशी (गोदावरी)
  • महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री (समीक्षक पसंती पुरस्कार) – गौरी देशपांडे (श्यामची आई)
  • महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक (समीक्षक पसंती पुरस्कार) – निखिल महाजन (गोदावरी)
  • महाराष्ट्राचा फेवरेट लेखक (समीक्षक पसंती पुरस्कार) – परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी (वाळवी)
  • महाराष्ट्राचा फेवरेट गीतकार (समीक्षक पसंती पुरस्कार) – गुरू ठाकूर (उमगाया बाप रं, बापल्योक)
  • महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट (समीक्षक पसंती पुरस्कार) – गोदावरी आणि आत्मपॅम्फ्लेट
  • महाराष्ट्राचा फेवरेट स्टाइल आयकॉन – रितेश देशमुख
  • महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता – रितेश देशमुख (वेड)
  • महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री – जिनिलीया देशमुख (वेड)
  • महाराष्ट्राचा फेवरेट दिग्दर्शक – रितेश देशमुख (वेड)
  • महाराष्ट्राचा फेवरेट चित्रपट – वेड
मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtracha favourite kon 2023 winners list riteish deshmukh and genelia deshmukh is favourite actor and actress pps