अनेक मराठी चित्रपट आणि मालिका गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यागंणा आणि सुचसंचालिका सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका सुद्धा आहे. तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड देखील आहे. या माध्यमातून ती मराठमोळे पारंपारिक नवीन दागिने लाँच करत असते. तिनं नुकतेच निळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे; जे चांगलेच चर्चेत आले आहे.
हेही वाचा – Bharti Singh: भारती सिंह पुन्हा एकदा देणार गोड बातमी? ‘या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
प्राजक्ता ही इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नवनवीन फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकतेच तिनं निळ्या साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिनं डीपनेक बॅकलेस ब्लाउज, अंबाडा आणि गुलाबाची पांढरी फुलं केसात माळलेली आहे. यामुळे प्राजक्ताचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. पण या फोटोमध्ये तिची एक पोज पाहून चाहत्यांनी तिला “गुडघेदुखी चालू आहे का?” असे प्रश्न विचारले आहेत.
हेही वाचा – जेव्हा तुझी मंगळागौर होईल, तेव्हा? ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीनं दिलं कौतुकास्पद उत्तर, म्हणाली…
या फोटोमध्ये प्राजक्ता गुडघ्यावर हात ठेवून पोज देताचा दिसतं आहे. हेच पाहून एका चाहत्यानं प्रतिक्रियेत लिहिलं की, “गुडघा दुखतोय का?” तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, “पाय दुखतोय का? हास्यजत्रा जोक सॉरी.” तसेच तिसऱ्या चाहत्यानं सुद्धा तेच विचारत लिहिलं आहे की, “गुडघेदुखी चालू झाली का?” अशाप्रकारेच प्रश्न प्राजक्ताच्या बऱ्याच चाहत्यांनी विचारले आहे. पण दुसऱ्या बाजूला तिचं सौंदर्य पाहून काही चाहते मात्र घायाळ झाले आहेत.
दरम्यान, प्राजक्ताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच तिचा ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, अलोक राजवाडे असे बरेच कलाकार झळकणार आहे. प्राजक्ताचा हा चित्रपट २९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.