मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ सध्या खूप चर्चेत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट दमदार बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन करत आहे. प्रेक्षकांचं या चित्रपटाला खूप प्रेम मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

‘नाच गं घुमा’ चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, सुकन्या कुलकर्णी, सारंग साठे, मायरा वायकूळ, शर्मिष्ठा राऊत, सुप्रिया पाठारे व कविता मेढेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नम्रता संभेरावच्या या चित्रपटाबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टवर नम्रता संभेरावने कमेंट करत प्रतिक्रिया दिली.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Tharala Tar Mag Maha Episode Promo Out Arjun Propose to sayali
Video: अर्जुनचं ‘ते’ कृत्य पाहून प्रियाला बसला धक्का आता…; पाहा ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या महाएपिसोडचा प्रोमो
Savlyachi Janu Savli
Video: “मी ही बघतेच कशी…”, हळदीच्या कार्यक्रमात भैरवीचे सावलीच्या वडिलांना चॅलेंज; मालिकेत येणार ट्विस्ट
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

हेही वाचा – कंगना रणौतने प्रचारसभेत अमिताभ बच्चन यांच्याशी केली स्वतःची तुलना; नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले, “हिचा शेवटचा…”

“नाच गं घुमा…पाहावा तर आमच्या नमासाठी… अफलातून कामगिरी.. तुझा अभिमान वाटतो नम्रता…”, अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यावर नम्रताने कमेंट केली. त्यावर ‘Sir thank you so much sir तुमच्याकडूनच आलंय सगळं,’ असं नम्रता म्हणाली.

sachin goswami post
सचिन गोस्वामी यांची पोस्ट

या पोस्टवर “सर माझ्यासाठी आणि परेशसाठी पण पाहू दे की, मस्करी करतेय, पण नमाने आउटस्टँडिंग काम केलं आहे, वादच नाही,” अशी कमेंट चित्रपटाची लेखिका मधुगंधा कुलकर्णीने केली आहे.

namrata sambherao
नम्रता संभेराव व मधुगंधा कुलकर्णीची कमेंट

सचिन गोस्वामी यांच्या पोस्टवर प्रसाद खांडेकरने कमेंट करत नम्रता संभेरावच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. याशिवाय अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करून चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा – सीबीआय अधिकाऱ्याची लेक, IAS व्हायचं स्वप्न पण झाली अभिनेत्री; ५१ व्या वर्षीही अविवाहित ‘प्रिया’ आहे एका मुलीची आई

‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झाल्यास पाच दिवसात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (१ मे रोजी) २.१५ कोटी रुपये कमावले होते, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ८० लाखांची कमाई केली. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने ९५ लाख रुपयांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. चौथ्या दिवशी चित्रपटाने १.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तर पाचव्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने २.०५ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचं पाच दिवसांचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ७.८० कोटी रुपये झालं आहे.