Arun Kadam-Vaishali Kadam: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असंख्य चाहते आहेत. याच कार्यक्रमात दादूस म्हणजेच अरुण कदम प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमात ते विविध पात्र साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अरुण कदम सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. ते त्यांच्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतात.

अरुण कदम यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम असून या जोडप्याला सुकन्या नावाची लेक आहे. सुकन्याचे लग्न झाले असून तिला गोंडस मुलगा आहे. अरुण कदम यांनी पत्नी वैशालीबरोबर नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत वैशाली यांनी दिसण्यावरून ट्रोल केलं जात असल्याचं सांगितलं. वैशाली यांनी अरुण यांना लग्नासाठी होकार दिला तेव्हा लोकांच्या काही प्रतिक्रिया सांगितल्या.

siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Bhushan Prabhan
“कलाकार म्हणून आपण एकमेकांचा आदर करणं शिकलो नाही”, भूषण प्रधानकडून खंत व्यक्त; म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने घेतली पहिली गाडी! सोबतीला होते आई अन् कुटुंबीय; म्हणाला, “संयमाची चार चाके…”

‘तुला चांगला मुलगा मिळू शकतो’

“आम्हाला दिसण्यावरून खूप ट्रोल केलं जायचं आणि आताही केलं जातं. पूर्वी जेव्हा मी लग्नासाठी यांना हो म्हणाले, तेव्हाही तसंच होतं. तू एवढी छान दिसतेस आणि हा असा, मग तू लग्न का करतेय. (‘मी आता तरी बरा दिसतो’ असं हसत अरुण कदम म्हणाले.) पूर्वी आम्ही बैठ्या चाळीत राहायचो. त्यावेळी सगळे म्हणायचे तू का करतेय, तू छान दिसतेस, तुला आणखी छान मुलगा मिळू शकतो. घरचे व बाहेरचे सगळेच असं म्हणत होते. फक्त माझे बाबा त्यांच्या मतावर ठाम होते की हा मुलगा तुला सुखी ठेवेल. त्यांचा एकच शब्द माझ्या डोक्यात होता. त्यामुळे मला कोणीही काहीही सांगितलं तरी मी लक्षच द्यायचे नाही,” असं वैशाली कदम ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या.

Arun Kadam Wife Vaishali
अरुण कदम व वैशाली कदम (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रसिद्ध अभिनेत्याच्या रेस्टॉरंटवर छापेमारी, सहा नियमांचे उल्लंघन; बचाव करत म्हणाला, “आपण कितीही दानधर्म केले तरी…”

फोटो पाहून लोक ट्रोल करतात – वैशाली कदम

“मी म्हणाले, एखादा सुंदर नवरा आहे आणि त्याने मला अर्ध्या संसारात सोडून दिलं तर त्याला कोण जबाबदार राहील. किंवा तो देखणा असेल आणि कमवतच नसेल तर काय करणार. अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आताही आमचे फोटो पाहून लोक ट्रोल करतात. एक हार घालतानाचा आमचा फोटो होता, त्यावर तुमचं लग्न आता झालं का? असं विचारलेलं. मी म्हटलं २० वर्षांपूर्वी लग्न झालंय, आता नाही झालेलं,” असं वैशाली कदम म्हणाल्या.

“मी खूप घाबरले होते, पण तो…”, मीनाक्षी शेषाद्रीने सांगितलेला सनी देओलबरोबर किसिंग सीनचा अनुभव

दरम्यान, वैशाली कदमदेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या आपल्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात.

Story img Loader