आपण जो विचार करतो त्यापलीकडे जाऊन आपल्या आजुबाजूला अनेक घटना घडत असतात. भीतीदायक वाटणाऱ्या घटनांमागचं नेमकं रहस्य काय असणार? याची उकल करताना थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट १४ जूनला प्रदर्शित झाला. आठ दिवसात या चित्रपटाने किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.

मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात आहेत. प्रीतम एस के पाटील यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १० लाख, दुसऱ्या दिवशी २० लाख, तिसऱ्या दिवशी ३७ लाख, चौथ्या दिवशी २४ लाख, पाचव्या दिवशी १५ लाख, सहाव्या दिवशी १५ लाख, सातव्या दिवशी १३ लाख आणि आठव्या दिवशी १७ लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने आठ दिवसांत एकूण १ कोटी ५१ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे.

‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर निराशा, सहा दिवसांत कमावले फक्त…

दुर्गम भागातल्या एका गावाची, तिथल्या माणसांची रहस्यमय कथा असलेला ‘अल्याड पल्याड’ हा थरारपट आहे. एका रहस्याची उकल करताना त्यांच्या भोवती वेगवेगळ्या धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली गोष्ट समोर येते. या घटनेची उकल कशी होते? सत्य काय आहे? उत्कंठा, शोध, यातून कोणतं ‘रहस्य’ उलगडणार? हे ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळतं.

‘मिर्झापूर’ मधील इंटिमेट सीनबद्दल अभिनेत्री रसिका दुग्गल म्हणाली, “रिहर्सलच्या वेळीच मला जाणवलं की…”

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांत चित्रपटाला पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळाला. २०० हून अधिक चित्रपटगृहांत हा चित्रपट प्रदर्शित झाला. ट्रेलर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता होती. मात्र एकूण कलेक्शन खूप चांगले नाही. परिणामी चित्रपटाने आठ दिवसांत दीड कोटी रुपये कमावले आहेत.

सेलिब्रिटींचा माग पापाराझी कसे काढतात? सर्वाधिक मागणी कोणाची? फोटोग्राफर म्हणाला, “अनेक भिकाऱ्यांकडे…”

आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारा एस. एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ हा चित्रपट आहे. ‘अल्याड पल्याड’ चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे तर संकलन सौमित्र धरसुलकर यांचे आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे यांचे आहे. कथा प्रीतम एस के पाटील यांची असून पटकथा संवाद संजय नवगिरे यांचे आहेत. वेशभूषा अपेक्षा गांधी तर ध्वनी स्वरूप जोशी यांचे आहे. कार्यकारी निर्माते संतोष खरात आहेत. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे.