Maharashtrachi Hasya Jatra Fame Prasad Khandekar : मराठी सिनेविश्वातील बरेच कलाकार सध्या ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पत्र लिहून व्यक्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूजा सावंतने देवाला पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. या पत्राद्वारे तिने मुक्या प्राण्यांविषयीचं आपलं मत मांडलं होतं. आता पूजा सावंत पाठोपाठ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लेखक, दिग्दर्शक व अभिनेता प्रसाद खांडेकरने खास पत्र लिहिलं आहे.

प्रसाद खांडेकरने हे पत्र रसिक मायबाप प्रेक्षकांना उद्देशून लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक थिएटरपर्यंत येत नाहीत. मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही अशा चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्र लिहित अभिनेत्याने प्रेक्षकांना भावनिक साद घातली आहे.

Prithviraj Chavan on delhi Government
Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
sai tamhankar arrange diwali pahat for loved ones
मुंबईत ४५ व्या मजल्यावर आहे सईचं आलिशान घर! लेकीच्या घरी आली लाडकी आई; ‘द इलेव्हन्थ प्लेस’मध्ये रंगली दिवाळी पहाट
Torres Scam in Mumbai
Torres Scam in Mumbai : टोरेस कंपनीत १३ कोटी बुडाले… भाजी विक्रेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Satya Nadella Praised Sharad Pawar for Agricultural Development Trust Baramati
Microsoft चे सीईओ सत्या नडेलांनी केलं कौतुक, शरद पवारांनी मानले आभार; नेमकं काय घडलं?
Marathi Actress Nupur Chitale
मालिकांमधून ब्रेक, ५ वर्षांसाठी गाठली दिल्ली अन्…; ‘रात्रीस खेळ चाले’मधली देविका आठवतेय का? अभिनेत्री सध्या काय करते?
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हेही वाचा : “त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच भेटू दिलं नाही”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

प्रसाद खांडेकरचं प्रेक्षकांसाठी पत्र

प्रसाद खांडेकर पत्र लिहित म्हणतो, “नमस्कार मी प्रसाद खांडेकर… सध्या मी बघतोय की, आमचे बरेच कलाकारमंडळी पत्र लिहित आहे म्हणूनच विचार केला आपणही पत्र लिहून व्यक्त व्हावं. आज मी काही व्यक्तींना पत्र लिहिणार आहे. प्रिय रसिक मायबाप, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्हीच डोक्यावर घेता आणि प्रसंगी आमचे कानही पकडता. मराठी चित्रपटसृष्टीला आणि नाट्यसृष्टीला तुमची गरज आहे. तुम्ही थिएटरमध्ये आलात तर, आम्हाला बळ मिळेल आणि मनोरंजनसृष्टीचे सोन्याचे दिवस परत येतील. थिएटरमध्ये या वाट बघतोय… तुमचे कृपाभिलाषी, सगळे कलाकार!”

अभिनेत्याच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संकेत माने यांनी सांभाळली आहे.

हेही वाचा : दोन देश, दोघांचं करिअरही वेगळं…; मराठी अभिनेत्याने गर्लफ्रेंडला गोव्यात घातली लग्नाची मागणी; म्हणाला, “२२ एप्रिल २०२२…”

हेही वाचा : अक्षराच्या माहेरी पोहोचली भुवनेश्वरी! अधिपतीला फोन केला अन् सुनेला दिलं खुलं आव्हान…; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

दरम्यान, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ या चित्रपटात मंगेश देसाई, कमलेश सावंत, सविता मालपेकर, प्रथमेश परब, सचिन नारकर, रेशम श्रीवर्धनकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय लोकप्रिय बालकलाकार मायरा वायकुळ सुद्धा या सिनेमात झळकणार आहे.

Story img Loader