मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं. याशिवाय गेली काही वर्षे तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. यामुळेच प्रसाद आणि हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमचं एक खास बॉण्डिंग आहे. वैयक्तिक आयुष्यात नवीन घर खरेदी करत अभिनेत्याने २०२४च्या सुरुवातीला त्याच्या सगळ्याच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.

हास्यजत्रेची संपूर्ण टीम गेले काही दिवस प्रसादकडे त्याच्या नव्या घराची पार्टी मागत होती. अखेर या सगळ्यांनी एकत्र येऊन जंगी सेलिब्रेशन केल्याचं प्रसादने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “…यात अभिमान कसला? शरम वाटली पाहिजे,” किरण मानेंचा रोख फडणवीसांकडे? म्हणाले, “फोडून आणलेल्या खजिन्यातल्या…”

प्रसाद आणि मंजिरी ओक यांनी मिळून मुंबईत काही दिवसांपूर्वीच आलिशान घर खरेदी केलं. या त्यांच्या नव्या घरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमने खास उपस्थिती लावली होती. अमित फाळके, पृथ्वीक प्रताप, चेतना भट, ओंकार राऊत, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, सचिन गोस्वामी, दत्तू मोरे, सचिन मोटे, समीर चौघुले, रोहित माने, निखिल बने, अरुण कदम, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, शिवाली, प्रियदर्शिनी इंदलकर या सगळ्यांचा एकत्रित फोटो प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : डोंबिवली स्टेशनला पहिली भेट, रिक्षा स्टॅन्डजवळ प्रपोज अन्…; ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीची लव्हस्टोरी आहे खूपच हटके

“ऐका हो ऐका…अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे…समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी. मंडळ आभारी आहे!” असं कॅप्शन प्रसादने या फोटोला दिलं आहे. याशिवाय या सगळ्या टीमने अभिनेत्याला त्याच्या नव्या घरासाठी भरभरून शुभेच्छा देत या जोडप्याने सुंदर पद्धतीने घर सजवल्याचं सांगितलं आहे.

नेटकऱ्यांनी प्रसादने शेअर केलेल्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “कशाला दिलीत पार्टी समीर दादाच्या स्किटमधला एक पंच कमी झाला”, “आता स्किटमध्ये काय बोलून टोमणा मारणार…” अशा भन्नाट कमेंट्स नेटकऱ्यांनी त्याच्या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader