‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे गौरव मोरे. ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. सध्या गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’व्यतिरिक्त विविध मराठीसह, हिंदी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज ४’, ‘अंकुश’, ‘लंडन मिसळ’ या चित्रपटांमध्ये तो झळकला. आता लवकरच त्याचे आगामी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. नुकताच गौरव अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने आतापर्यंतचा प्रवास आणि बरेच खुलासे केले.
‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये गौरव मोरेबरोबर रॅपिड फायर हा खेळ खेळण्यात आला. यावेळी गौरवला त्याच्या क्रशपासून आवडती गाडी असे अनेक प्रश्न विचारले गेले. या रॅपिड फायरच्या खेळात पहिलाचा प्रश्न भार्गवीने विचारला की, तुझी सेलिब्रिटी क्रश कोण आहे? यावर गौरव म्हणाला, “सई मॅम (सई ताम्हणकर). पहिल्यापासून त्या माझ्या क्रश आहेत. मला संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त सई मॅम आवडतात. मग ती कुठलीही इंडस्ट्री असो मराठी किंवा हिंदी.” यानंतर गौरवला सईला चुकून केलेल्या मेसेजविषयी विचारलं गेलं.
हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”
भार्गवी म्हणाली, “तू एकदा तिला मेसेज केला होतास. काय झाला होतो तो किस्सा? थांबा आता रॅपिड फायरमधून ब्रेक घेऊन मला आता हा प्रश्न विचारायचा आहे. हास्यजत्रेमध्ये असताना सई मॅमला तू ‘माल’ असा काहीतरी मेसेज केला होतास?” याविषयी गौरव म्हणाला, “मी मॅम असं लिहिणार होतो. ते टाइप करताना एल दाबला आणि जे काही पुढे झालं. मला असं झालं होतं हे काय झालं? काही कळतं नव्हतं.”
हेही वाचा – आलिया भट्टच्या लेकीची एक-दोन नाही तर ‘एवढी’ आहेत टोपणं नावं; म्हणाली, “लॉलीपॉप…”
त्यानंतर भार्गवी विचारते, “नक्की काय घडलं होतं?” गौरव म्हणाला, “त्यांनी (सई ताम्हणकर) मला वाढदिवसानिमित्ताने किंवा इतर कशाच्या तरीनिमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा मी त्यांना थँक्यू मॅम असं लिहिणार होतो. पण तिथे एमएएल (MAL) टाईप झालं आणि ‘माल’ असं लिहून गेलं. सई मॅमने ते लगेच बघितलं, तो मेसेज ब्ल्यू टीक झाला. त्यामुळे डिलीट करून शकलो नाही. म्हटलं आता गेलो. एका हास्यजत्रेच्या स्किटमध्ये हा किस्सा केला होता.”