मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते भरत जाधव यांचा आज वाढदिवस आहे. दमदार अभिनयाने अल्पावधीतच त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. ‘जत्रा’, ‘साडे माडे तीन’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘पछाडलेला’ अशा एक सो एक चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने भरत जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. गौरव भरत जाधव यांच्यासह काही दिवसांपूर्वी लंडनला चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. लंडनमधील एक फोटो शेअर करत गौरवने भरत जाधव यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरत सर. लव्ह यू सर” असं कॅप्शन गौरवने पोस्टला दिलं आहे.
हेही वाचा>> अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर राम गोपाल वर्माने कुत्र्याशी केली स्वतःची तुलना, म्हणाला…
गौरवच्या या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा पाऊस पाडला आहे. या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी भरत जाधव यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही पाहा>> Photos: हार्दिक जोशी ते रणबीर कपूर, लग्न लागताच भर मांडवात ‘या’ सेलिब्रिटींनी केलं पत्नीला किस
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवणारा गौरव ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. गौरव लवकरच भरत जाधव यांच्यासह चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याआधी तो ‘हवाहवाई’ चित्रपटात दिसला होता.