‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर सध्या ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. पण दुसऱ्याबाजूला नम्रता आणि प्रसादची ‘कुर्रर्रर्र’ या नाटकातून एक्झिट झाली आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच दोघांनी भावुक पोस्ट शेअर करून नाटकामधून एक्झिट होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

अभिनेत्री नम्रता संभेराव ‘कुर्रर्रर्र’ नाटकाचा नवा पोस्टर आणि काही फोटो शेअर करत म्हणाली,”‘कुर्रर्रर्र’ या नाटकातली माझी भूमिका पूजाची खूप आठवण येईल…माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मला याच नाटकाने मिळवून दिलं. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं, अत्यंत व्यस्त शेड्यूलमधून आम्ही ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाचे २ वर्षात २०० हून अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली. बॅकस्टेज (backstage) आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे.”

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

“काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे, नाटकासाठीच घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार कराल अशी खात्री आहे. यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या ‘कुर्रर्रर्र’ या नाटकावर, नवीन संचावर कराल अशी अशा आहे. मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या एक्झिट (exit) घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय, तिथून कधीच एक्झिट (exit) होत नसते. माझ्या शुभेच्छा कायमबरोबर असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सप्रीम (supreme) प्रियदर्शन दादा तुम्हाला व ‘कुर्रर्रर्र’च्या सर्व टीमला पुढील प्रयोगांसाठी, हाऊसफूल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही…भेटू लवकरच,” असं नम्रताने लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ‘या’ खास पाहुण्यांची हजेरी, ‘बिग बॉस’ फेम गायकाच्या गाण्यावर थिरकणार गोखले-कोळी कुटुंब

तसेच अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद खांडेकरने लिहिलं आहे, “‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकातील बदलावरून खूप मेसेज आणि फोन आले त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच. हा बदलाचा निर्णय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सगळ्या टीमबरोबर चर्चा करून सामोपचाराने घेतला आहे. माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळच आणि महत्वाचं नाटक. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार मिळवून देणार पहिलं नाटक. ‘कुर्रर्रर्रर्र’च्या या सव्वा दोनशे प्रयोगात तुम्ही रसिकांनी उत्तम साथ दिली…खूप प्रेम केलं. साधारण कोविड काळात सुरू केलेलं नाटक फक्त आणि फक्त तुम्हा रसिकांच्या प्रेमामुळे टिकलं. अत्यंत बिझी शेड्युलमधून नाटक करण्याचा निर्णय घेतला तो फक्त नाटकाच्या प्रेमाखातरच.”

हेही वाचा – ‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; हृता दुर्गुळेसह ‘या’ कलाकार मंडळींनी लावली हजेरी

पुढे प्रसादने लिहिलं, “शूटिंग आणि इतर बऱ्याच गोष्टी सांभाळत तारेवरची कसरत करत गेल्या दोन वर्षात हे सव्वा दोनशे प्रयोग केले. खूपच दमछाक होत होती. पण टीम मधील कलाकार मुख्यतः बॅकस्टेज टीम यांचा विचार करता लक्षात येऊ लागलं…फक्त आपल्यामुळे प्रयोगांची संख्या कमी होतेय…जिथे नाटकाचे १० ते १२ प्रयोग होऊ शकतात तिथे फक्त आमच्या डेट्समुळे ५ ते ६ प्रयोग होतायत हे लक्षात आलं आणि आपल्यामुळे कलाकारांवर आणि बॅकस्टेज टीमवर अन्याय नको म्हणून SHOW MUST GO ON नुसार अगदी दोन महिने आधी ठरवून सर्वानुमते टीमने एकत्र डिस्कस करून हा बदल करायचं ठरवलं. बदल हा नेहमी चांगलंच घडवतो आणि हा बदल तर अगदी जवळचा आहे…प्रियदर्शन आणि मयुरा दोघे ही खूप जवळचे मित्र आहेत ‘कुर्रर्रर्रर्र’चा गाडा दोघे आणखी उत्तमच हाकतील याची खात्री आहे. आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी सगळ्या टीमचे कलाकारांचे बॅकस्टेज कलाकारांचे…पॅडी, गोट्या काका, हेरंब, विशाखा ताई, सुनिल, महेश दादा, युजे, पूनम ताई, नम्रता आणि सर्वात महत्वाचे तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार…”

“‘कुर्रर्रर्रर्र’मधून रंगमंचावरून थोडा लांब गेलो असलो तरी लेखक दिग्दर्शक म्हणून माझंच अपत्य आहे ते. ज्या कलाकृतीवर मनापासून प्रेम केलं आणि ज्या कलाकृतीने भरभरून दिलंय अशी सुरू असलेली कलाकृती सोडून जाणे हे खूप त्रासदायक असतं पण प्रसंगी नवीन काही करण्यासाठी असे कटू निर्णय घ्यावे लागतात. बाकी आजपर्यंत ‘कुर्रर्रर्रर्र’वर जितकं प्रेम केलंत तितकंच किंबहूना त्यापेक्षा अधिकच प्रेम यापुढे कराल याची खात्री आहे. नाटक घडत राहो…ता.क. रंगभूमी आणि नाटकापासून फार काळ लांब राहू शकत नाही…सगळ्या टीमचा विचार करून आणि व्यवस्थित शेड्युल करून..लवकरच पुन्हा नवीन नाटक घेऊन येईन,” असं प्रसादने लिहिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकर यांच्या एक्झिटनंतर ‘कुर्रर्रर्र’ नाटकात त्यांच्याजागी मयुरा रानडे आणि प्रियदर्शन जाधवची एन्ट्री झाली आहे.

Story img Loader