‘बॉईज’ आणि ‘बॉईज २’ व ‘बॉईज ३’ हे तिन्ही चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर आता ‘बॉईज ४’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीप्रमाणेच या चौथ्या भागातही कॉलेजवयीन मुलांची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा काही भाग लंडनमध्ये शूट करण्यात आला. पण त्यावेळी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या निखिल बनेला नेलं नाही. त्याबद्दल आता त्याने भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉईज ४’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. त्यातून या चित्रपटात मित्रांची ही गँग लंडनमध्ये धमाल मस्ती करताना, नाचताना, गाताना पाहायला मिळणार आहे, असं दिसत आहे. परंतु त्यामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने नाही. आता त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : “तो अत्यंत…,” ऋतुजा बागवेने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेबरोबर काम करण्याचा अनुभव

या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान दिलेल्या आहे का मुलाखतीत तो म्हणाला, “या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी लंडनमध्ये नव्हतो. मला खूप वाईट वाटलं पण नंतर त्या सगळ्यांनी मला खूप मिस केलं. आमचा सगळा क्रू लंडनला शूटिंगला गेला होता. पण तिथे गेल्यावर त्यांना असं वाटायला लागलं की बनेही इथे आपल्याबरोबर हवा होता. गौरवही मला तिथून फोन करायचा आणि म्हणायचा, तू इथे हवा होतास. आम्ही तुला मिस करत आहोत. या चित्रपटात माझं लंडनशी कनेक्शन आहे पण ते कसं आहे, कुठल्या अर्थाने आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.”

हेही वाचा : “कार्यक्रमात माझ्या जाडेपणाबद्दल विनोद केले तर…”, विशाखा सुभेदार स्पष्टच बोलल्या, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं उदाहरण देत म्हणाल्या…

दरम्यान ‘बॉईज ४’ चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.