छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो. कार्यक्रमातील हास्यवीर प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतात. अफलातून विनोद शैलीने प्रेक्षकांना खळखळवून हसवणाऱ्या समीर चौगुलेंनाही याच कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली.

विनोदी नट म्हणून ओळख मिळवलेले समीर चौगुले विविधांगी भूमिका साकारताना दिसतात. आजवर अनेक मालिक व चित्रपटांतून त्यांनी अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. आता ते एक नव्या चित्रपटातून आणि नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर चौगुलेंनी चित्रपटातील त्यांच्या लूकचा फोटो शेअर करत ही बातमी चाहत्यांना दिली आहे.

हेही वाचा>>“मी तुझ्यावर प्रेम करतो”, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकच्या नवऱ्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

‘बांबू’ असं समीर चौगुलेंच्या नवीन चित्रपटाचं नाव आहे. येत्या २६ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. “नवी फिल्म, नवा आमचा पण अवतार…!!”, असं कॅप्शन त्यांनी शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा>>‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिक झळकणार मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

हेही वाचा>>शीझानचे दुसऱ्या मुलीशी सुरु होतं अफेअर, तुनिषाने चॅट वाचले अन्…; आई वनिता शर्माचा खुलासा

समीर चौगुलेंनी याआधी अनेक चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हवाहवाई’ चित्रपटात ते दिसले होते. ‘चंद्रमुखी’ चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Story img Loader