‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. अभिनयाच्या जोरावर शिवालीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. उत्तम अभिनय व विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवाली प्रेक्षकांना खळखळवून हसवते. हास्यजत्रेतील स्किटमध्ये ती विविधांगी भूमिका उत्कृष्टरित्या साकारते. आता शिवाली चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवाली पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. ‘उलगुलन’ असं शिवालीच्या नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं नाव आहे. तृशांत इंगळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा>> रणबीर कपूर ‘आदिपुरुष’ सिनेमाची १० हजार तिकिटे खरेदी करणार, कारण…

शिवालीच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी शिवाली ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटातील तिच्या किसिंग सीनची बरीच चर्चा रंगली होती.

हेही वाचा>> अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी प्रसिद्ध गायकाला अटक, आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा आरोप

हास्यजत्रेतून घराघरात पोहोचलेली शिवाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. शिवाली तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती पोस्टमधून चाहत्यांना देत असते. त्याबरोबरच अनेकदा ती फोटो व व्हिडीओही शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame shivali parab new marathi movie ulgulan kak