केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची टीझरपासूनच चर्चा होती. ३० एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही पसंती मिळाली. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करत आहेत. चित्रपटाप्रमाणेच त्यातील गाण्यांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं.
‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटातील बहरला हा मधुमास गाण्याने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं. काही केल्या या गाण्याची क्रेझ कमी होताना दिसत नाही. ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या गाण्यावर रील बनवले आहेत. आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचलेल्या नम्रता संभेराव व विशाखा सुभेदार यांनाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भूरळ पडली आहे.
हेही वाचा>> “१५ लोकांनी महिनाभर रोज बलात्कार…”, ‘द केरला स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य, म्हणाली, “प्रेमात…”
नम्रता व विशाखा त्यांच्या नाटकाच्या प्रयोगासाठी सध्या अमेरिकेत आहेत. तिथे त्यांनी ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. नम्रताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नम्रता व विशाखा ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याची हूक स्टेपही त्यांनी केली आहे.
हेही वाचा>> The Kerala Story : अदा शर्माचा ‘द केरला स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुसाट, १३व्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील नम्रता व विशाखाच्या या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.