‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. लहान वयोगटातील मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच हा कार्यक्रम आवडीने पाहतात. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमामध्ये काम करणारे कलाकारही प्रसिद्धीच्या झोतात आले. यामधीलच एक कलाकार म्हणजे समीर चौघुले. समीर यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. शिवाय सध्या ते एकापाठोपाठ एक मराठी चित्रपट करत आहेत.
आणखी वाचा – वहिनीच्या ‘त्या’ एका निर्णयानंतर रितेश देशमुखही भारावला, पोस्ट शेअर करत म्हणाला, “हे तर…”
नुकताच समीर यांचा ‘जग्गु आणि ज्युलिएट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अमेय वाघ वैदेही परशुरामी मुख्य भूमिकेमध्ये आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या ग्रँड प्रीमियरला समीर त्यांच्या वडिलांना घेऊन आले होते. यावेळी समीर यांच्या वडिलांनी चित्रपट पाहून मुलाचं तोंडभरुन कौतुक केलं.
‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर यांच्या वडिलांनी म्हटलं की, “हा चित्रपट खूपच उत्तम आहे. सगळ्या कलाकारांचं काम खूप मस्त आहे. शिवाय समीरच्या कामामुळे मला अनेक प्रतिक्रिया येत असतात. तुमचा मुलगा जे काही काम करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे असं लोक मला बोलतात. मुलामुळे मला लोक ओळखायला लागले. त्याच्यामुळेच मला ओळख मिळाली आहे.”
आणखी वाचा – गर्लफ्रेंडचा छळ, मारहाण, गाण्यांमध्येही शिवीगाळ अन्…; पुण्यात राहणाऱ्या एमसी स्टॅनचं आधी कसं होतं आयुष्य?
“माझा एक मित्र आहे त्याने मला विचारलं की, आमच्या इमारतीचं उद्घाटन आहे तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन याल का? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की, मी काही सांगू शकत नाही कारण तो त्याच्या कामामध्ये खूप व्यग्र असतो. घरामध्येही आमचं एकमेकांशी बोलणं होत नाही. पण मेहनत खूप करतो. त्याने मेहनत केली म्हणून त्याचं फळ आज समीरला मिळालं. हे बघण्यासाठी आज त्याची आई नाही याचं जास्त वाईट वाटतं मला.” वडील करत असलेलं कौतुक ऐकून समीरही यावेळी भावूक झाले.