‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गौरव मोरे नावारुपाला आला. फिल्टर पाड्याचा बच्चन या नावानेही त्याला आता ओळखलं जातं. गौरव आता मराठी चित्रपटांमध्येही काम करताना दिसतो. इतकंच नव्हे तर त्याला जाहिरातींच्याही ऑफर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘हवाहवाई’ चित्रपट प्रदर्शित झाला. आता तो आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. तेथीलच गौरवचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरव ‘लंडन मिसळ’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेता भरत जाधव यांच्याबरोबर काम करताना दिसेल. लंडनला जात असताना भरत जाधव यांच्याबरोबर फोटो पोस्ट करत गौरवने याबाबत माहिती दिली होती. आता लंडनच्या रस्त्यावरील एक व्हिडीओ अभिनेता निखिल चव्हाणने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये गौरव निखिल चव्हाण, भरत जाधवसह ‘ए मेरी जोहरा जबी’ गाणं गाताना दिसत आहेत. आधी फक्त भरत जाधवच माईकवर गाणं गात असतात. त्यानंतर निखिल, गौरवची एण्ट्री होते आणि गाणं गाण्यासाठी तिघंही भांडू लागतात. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत गौरव मोरे लंडनला रवाना, पोस्ट शेअर करत म्हणाला, “खूप भारी…”

“मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भरत जाधव सरांबरोबर लंडनला निघालो आहे. खूप उत्सुकता आहे. तसंच खूप भारी वाटत आहे. ज्यांना मी बाल्कनीमधून बघितलं आहे त्यांच्याबरोबर मी आज प्रवास करत आहे. लवकरच भेटूया…” अशी पोस्ट काही दिवसांपूर्वी गौरवने शेअर केली होती. सध्यातरी गौरव चित्रीकरणामधून मिळालेल्या वेळेमध्ये लंडन फिरत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem gaurav more bharat jadhav london street viral video see details kmd
Show comments