‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर त्याच्यावर अनेक प्रेक्षक नाराज झाले होते. त्याने या कार्यक्रमाला रामराम करत झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ कार्यक्रमात एण्ट्री केली. २० टक्के वाढीसाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला असल्याची टीकाही ओंकारवर झाली.
आणखी वाचा – Bigg Boss 16 मधील ‘या’ अभिनेत्रीबरोबर साजिद खानचं अफेअर? नाव समोर येताच म्हणाली, “मी त्यांच्याकडे…”
पण या सगळ्या ट्रोलर्सला कोणतंच उत्तर न देता ओंकारने त्याचं काम सुरू ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच ओंकारचा ‘सरला एक कोटी’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. आता ओंकारला एक नवी लॉट्री लागली आहे. मराठीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर ओंकार काम करणार आहे.
ओंकार दिग्दर्शक संजय जाधव यांच्या आगामी चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटाचं रिडींग करण्यासाठी काही कलाकार एकत्र जमले होते. तोच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर अशी वागते सई ताम्हणकर, प्राजक्ता माळीचा खुलासा, म्हणाली, “ती कोणाशीही “
या व्हिडीओमध्ये संजय जाधव यांच्यासह अभिनेता संजय नार्वेकर, ओंकार भोजने, हरिश दुधाणे दिसत आहेत. पण हा चित्रपट नक्की कोणता? यामध्ये ओंकारची भूमिका काय? हे अद्यापही समोर आलेलं नाही. पण ओंकार आता मराठी चित्रपटांकडे अधिकाधिक वळला असल्याचं दिसून येत आहे.