सध्या मराठी सिनेसृष्टीत ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा बोलबोला सुरू आहे. काल, १ मेला ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे पुन्हा एकदा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करून हा चित्रपट पाहायला जात आहेत.

परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात झाली आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेत्री नम्रता संभेराव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१३ कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे सध्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या टीमचं कौतुक होतं आहे. इतर कलाकार मंडळी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचं कौतुक करत चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहन करत आहेत.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Sameer Paranjape
‘थोडं तुझं थोडं माझं’ फेम समीर परांजपेने गायलं हटके स्टाईलने ‘नाच रे मोरा’ गाणं; नेटकरी म्हणाले, “विचार नव्हता केला…”
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा – “मला उत्तम मान अन् पैसे…”, प्रसाद ओकने हिंदीत काम न करण्यामागचं कारण केलं स्पष्ट, म्हणाला…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने देखील ‘नाच गं घुमा’ चित्रपटासाठी खास पोस्ट लिहिली आहे. ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत लिहिलं आहे, “‘नाच गं घुमा’ आवर्जून बघा मंडळी आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या घुमासाठी हा चित्रपट बघा…खूपच सुंदर चित्रपट…सगळ्याच कलाकारांची आणि तंत्रज्ञाची उत्तम कामे…मुक्ता ताई , सुकन्या ताई , सुप्रिया ताई, सारंग , मायरा सगळ्यांनीच धमाल केलीय…हलका फुलका हसवत जाणारा चित्रपट कधी आपल्या डोळ्यात पाणी आणतो कळत नाही…आणि आमची नमा…तू आतापर्यंत केलेल्या कामांपैकी मला सर्वात जास्त आवडलेलं काम आहे हे नमा…कायच्या काय काम केलंयस तू…तू जगलीयस ती भूमिका…Keep it up…तुला अजून अशाच उत्तमोत्तम भूमिका मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

“स्वप्नील दादा आणि सर्व निर्माते, संपूर्ण टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. खूप खूप प्रेम…खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला,” असं प्रसाद खांडेकरने लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’पेक्षा ‘नाच गं घुमा’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

दरम्यान, ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या लेखनाची धुरा परेश मोकाशी-मधुगंधा कुलकर्णी यांनी सांभाळली आहे. तसेच परेश व मधुगंधा यांच्याबरोबर स्वप्नील जोशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, तृप्ती पाटील हे ‘नाच गं घुमा’ चित्रपटाचे निर्माते आहेत. आता येत्या काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader