मराठी, हिंदी मनोरंजनसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, त्यांच्या आत्महत्येमुळे मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे. प्रत्येकाला नितीन देसाई यांनी असं का केलं? हा प्रश्न पडला आहे. मराठीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी नितीन देसाईंच्या आत्महत्येवर नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना महेश कोठारे म्हणाले की, “माझ्या पायाखालची जमीन सरकली आहे. ‘झपाटलेला २’ हा चित्रपट जो थ्रीडीमध्ये केला होता, त्या चित्रपटाचे पूर्ण प्रोडक्शन नितीन देसाई यांनी डिझाइन केलं होतं. शिवाय तो चित्रपट एन.डी. स्टुडिओमध्ये शूट केला होता. त्यांच्या आत्महत्येबद्दल ऐकून मला फार दुःख झालं आहे. ही आजची मोठी धक्कादायक बातमी आहे आणि त्यात आत्महत्या असल्यामुळे हे खूप आश्चर्यकारक आहे. त्यांनी असं का केलं तेच कळत नाहीये.”

हेही वाचा – “माझ्यासाठी खूप मोठा धक्का…”, कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येवर खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले दु:ख

“काहीही असूदे, नितीन देसाई नेहमी मला फोन करायचे. जेव्हा त्यांच्या मुलीचं लग्न होतं, तेव्हा त्यांनी मला आवर्जून बोलावलं होतं. त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवलं आहे. त्यांचं आणि माझं नातं फार वेगळं होतं, जवळचं नातं होतं. ते अजिबात दडपणाखाली नव्हते. तो खूप जॉली माणूस होता”, असं महेश कोठारे म्हणाले.

हेही वाचा – Nitin Desai Suicide: “नितीन दादाने असं का केलं…” कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर अभिजीत पानसेंची प्रतिक्रिया

हेही वाचा – पुण्याच्या नवीन मेट्रोमधून मराठमोळ्या अभिनेत्याने पहिल्यांदाच केला प्रवास; म्हणाला, “पुणेकरांनी…”

दरम्यान, नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. २००५ साली त्यांनी कर्जतमध्ये त्यांचा एन. डी. स्टुडिओ उभा केला. याच स्टुडिओमध्ये त्यांनी ५८व्या वर्षी स्वतःचे जीवन संपवले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh kothare first reaction on nitin chandrakant desai suicide pps
Show comments