९०च्या काळात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी लोकप्रिय ठरली होती. या दोघांच्या जिवलग मैत्रीने आजवर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. या जोडीचे सिनेमे आजही लोकं आवर्जून पाहतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘धुमधडाका’, ‘दे दणा दण’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. २००४ साली प्रदर्शित झालेला ‘पछाडलेला’हा चित्रपट या जोडीचा शेवटचा सिनेमा ठरला, कारण दुर्दैवाने २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डे यांचं अल्पशा आजाराने निधन झालं.

हेही वाचा… ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम साईराज केंद्रेचा ‘पुष्पा-२’च्या गाण्यावर हटके डान्स, व्हिडीओ व्हायरल

महेश कोठारे यांनी जवळजवळ त्यांच्या प्रत्येक कलाकृतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांना महत्त्वाच्या भूमिका दिल्या होत्या. जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे हे जग सोडून गेले तेव्हा महेश कोठारे यांच्या जीवनात एक पोकळी निर्माण झाली होती. याबद्दल लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत महेश कोठारे व्यक्त झाले आहेत.

महेश कोठारे म्हणाले, “जेव्हा मला कळलं की लक्ष्या आपल्यात नाही आहे, तेव्हा माझं जग हलल होतं. मला रात्री ३ वाजता रवींद्र बेर्डेचा फोन आला आणि तो मला म्हणाला, आपला लक्ष्या गेला रे; तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी, डॅडी, निलिमा आम्ही सगळे लक्ष्याजवळ गेलो. लक्ष्या तिथे असा निर्जीव पडला होता. मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा माझ्या तोंडात एकच वाक्य आलं. व्हॉट हॅव यू डन लक्ष्या, यू फूल (तू हे काय केलंस लक्ष्या, मूर्ख) बॅड लक.”

हेही वाचा… “जाड किंवा बारीक…”, ट्रोल झालेल्या महिलांसाठी सोनाली कुलकर्णीने दिला मोलाचा सल्ला, म्हणाली…

महेश कोठारे पुढे म्हणाले, “लक्ष्या जर आज असता तर माझं आयुष्य खूप वेगळं असतं आणि मला वैयक्तिक आयुष्यात तसंच माझ्या चित्रपटांसाठी त्याचा नक्कीच खूप फायदा झाला असता. तो गेल्याने अचानक माझ्या आयुष्यामध्ये एक पोकळी निर्माण झाली. जेव्हा मी ‘खबरदार’ हा चित्रपट केला, तेव्हा ती माझी अशी पहिली कलाकृती होती, जिथे माझ्याबरोबर माझा लक्ष्या नव्हता, म्हणून त्या चित्रपटाच्या सुरुवातीला मी त्याचा फोटो लावला होता आणि ही दोस्ती तुटायची न्हाय हे गाणं त्या फोटोला जोडलं होतं.”

हेही वाचा… ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरने ‘पुष्पा-२’ च्या गाण्यात आणला ट्विस्ट, डान्स व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, महेश कोठारे यांचा ‘झपाटलेला-३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १७ एप्रिव रोजी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत महेश कोठारे यांनी ही गुड न्यूज प्रेक्षकांना दिली.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh kothare on laxmikant berde death news lakshya passed away in 2004 dvr