महेश कोठारे दिग्दर्शित ‘झपाटलेला’ चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. लक्ष्मीकांत बर्डे, किशोरी अंबिये, दिलीप प्रभावळकर, विजय चव्हाण, पूजा पवार, रविंद्र बेर्डे अशी तगडी कलाकार मंडळी असलेला ‘झपाटलेला’ चित्रपट आजही आवडीनं पाहिला जातो. मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटानं अढळ स्थान निर्माण केलं आहे. अशा लोकप्रिय चित्रपटाचं खास कनेक्शन शरद पवारांशी आहे? ते कसं काय? याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमधून महेश कोठारे यांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महेश कोठारे यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शरद पवार व ‘झपाटलेला’ चित्रपटाच्या कनेक्शनविषयी सांगितलं. ते म्हणाले, “जेव्हा माझा चित्रपट ‘झपाटलेला’ आला तेव्हा माझी अशी इच्छा होती की, मराठीतला पहिला चित्रपट परदेशात प्रदर्शित करायचा. कारण चित्रपट गाजला होता आणि लोकांना खूप आवडला होता. तर मला असं वाटलं हा चित्रपट आपण लंडनमध्ये प्रदर्शित करूया. लंडनमध्ये बऱ्यापैकी मराठी प्रेक्षक आहेत. त्यामुळे आम्ही मग लंडनला गेलो. आमचं सगळं कुटुंब गेलं होतं. आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो. तेव्हा म्हटलं, आपल्याला तिकडे प्रिमियर करता येतो का? बघू या.”

हेही वाचा – Video: घायल शेर लौट आया है…; बहुप्रतीक्षित ‘मिर्झापूर ३’चा टीझर प्रदर्शित, ‘या’ तारखेला वेब सीरिज होणार रिलीज

“माझा सख्खा चुलत दूरचा भाऊ होता. आता तो अहयात नाहीये. मधूकर कोठारे असं त्याचं नावं. तेव्हा लंडनमध्ये तो लोकप्रिय होता. त्याची पत्नी शिला कोठारे. त्यावेळेला लंडनचं मराठी महामंडळ होतं त्याची शिला वहिनी अध्यक्ष किंवा सेक्रेटरी होती. लंडनला गेल्यानंतर त्यांच्या पुढ्यात मी माझी इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली, येस, कल्पना मस्त आहे. मी नियोजन करते. आपण प्रीमियर इथे करायचा. तिनं तिथल्या सगळ्या मराठी लोकांना याबाबत सांगितलं. पत्रक, वेबसाईट, इ-मेल या माध्यमातून तिनं सगळ्यांना कळवलं. तो शो हाऊसफुल्ल झाला. आम्ही १३ फेब्रुवारी १९९४ साली हा प्रीमियर केला होता. पण त्यावेळेला आम्ही सगळे परत आलो होतो. त्यामुळे प्रीमियरसाठी पुन्हा लंडनला जायला लागलं होतं.”

हेही वाचा – “आता माझी वेळ…नियम वेगळे, खेळ तोच”, सलमानऐवजी अनिल कपूर यांची जबरदस्त एन्ट्री, पाहा ‘बिग बॉस ओटीटी ३’चा नवा प्रोमो

“माझ्या चुलत बहिणीचे पती होते, जे माझे मित्र होते. त्याची शरद पवारांबरोबर चांगली ओळख होती. माझी पण ओळख होती. पण त्याची अधिक चांगली ओळख होती. मग तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. तेव्हा शरद पवार इतके व्यग्र होते ना. त्यावेळेस ते नुकतेच मुख्यमंत्री झाले होते. तसंच यावेळेला बॉम्बस्फोट झाले होते, बॉम्बस्फोटानंतर त्यांना मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे खूप काम होती. सतत भेटीगाठी सुरू होत्या. मला त्यांनी कसाबसा वेळ दिला होता. त्यांनी मला लगेच आतमध्ये बोलावलं. मला वेळ नाहीये, लवकर आतमध्ये या, काय आहे सांग लवकर. मी म्हटलं, असं असं आहे वगैरे. आटकेपार झेंडा वगैरे शब्द वापरले. म्हटलं लंडनला पुन्हा जायचं आहे तर माझ्याकडे तेवढा फंड नाहीये. ते म्हणाले, ओके तू आता जा. मला आता वेळ नाहीये वगैरे. त्यामुळे मला वाटलं आता काही होणार नाही. पण दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला तुमचा चेक तयार आहे घेऊन जा. मी लगेच म्हटलं तयारीला लागा, तिकिट काढा, मी चाललो. यावेळी मी एक जाहिरात दिली होती. माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशीर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला,” असं महेश कोठारेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh kothare revealed connection of sharad pawar and zapatlela movie pps