छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मानल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं अक्षय केळकरने. तर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर या पर्वाची उपविजेती ठरली. या पर्वात सुरुवातीपासूनच अपूर्वा नेमळेकरची सर्वत्र चर्चा होती. तिने ‘बिग बॉस ४’ जिंकावं यासाठी तिचे चाहतेही प्रयत्न करत होते. पण तिला विजेतेपद मिळालं नाही. तसं असलं तरी तिने या शोमधून बाहेर पडताना एक मोठी गोष्ट कमावली आहे असा खुलासा तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या कार्यक्रमात अपूर्वाच्या खेळाडूवृत्तीने, तिच्या स्पष्टवाक्तेपणामुळे सर्वांचं लक्ष वेधलं. तिचा हा बेधडक अंदाज पाहून ती ‘बिग बॉस ४’ जिंकेल असं सर्वांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. अक्षय केळकरने ‘बिग बॉस ४’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. पण अपूर्वाच्या वाट्याला एक मोठं यश आलं आहे.

आणखी वाचा : राखी सावंतचं झालंय बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

‘इ-सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “‘बिग बॉस ४’ची ट्रॉफी मी जिंकू शकले नाही, पण महेश मांजरेकरांनी माझं खूप कौतुक केलं. “तू ज्या पद्धतीने खेळलीस ते मी पाहिलं. एक कलाकार म्हणून, स्पर्धक म्हणून तू उत्तम खेळलीस. एक दिग्दर्शक म्हणून मी जे पाहायचं ते नक्कीच तुझ्यात हेरलं आहे. त्यामुळे आपण लवकरच एकत्र चित्रपट करूया, असं मला महेश मांजरेकर म्हणाले. त्यांचे हे शब्द ऐकून मी खरंच धन्य झाले.” आता तिच्या या बोलण्याने ती महेश मांजरेकरांच्या कोणत्या आगामी चित्रपटात झळकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : मनाविरुद्ध नाही तर अब्दु रोजिक स्वेच्छेने पडला ‘बिग बॉस’च्या बाहेर, अखेर एग्झिटमागचं खरं कारण आलं समोर

‘बिग बॉस ४’च्या आधी अपूर्वा नेमळेकर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताच्या भूमिकेत दिसली. या मालिकेतील तिच्या कामचं खूप कौतुक झालं. शेवंताच्या भूमिकेमुळे तिचा चाहतावर्गही प्रचंड वाढला. तर बिग बॉसमधील तिच्या कामगिरीमुळे तो चाहतावर्ग आणखीन वाढला आहे.